SBI Digital Services Temporarily Unavailable on March 23 Saam tv
बिझनेस

SBI च्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी! UPI सह 'या' सेवा उद्या राहणार बंद; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SBI Digital Services: जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एसबीआयच्या काही सेवा उद्या म्हणजेच 23 मार्च रोजी बंद राहणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

SBI Digital Services Temporarily Unavailable on March 23:

जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एसबीआयच्या काही सेवा उद्या म्हणजेच 23 मार्च रोजी बंद राहणार आहेत. या सेवांमध्ये नेट बँकिंगचाही समावेश आहे. जाणून घ्या किती वेळ आणि कोणत्या सेवा बंद राहतील?

स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. यात सांगण्यात आलं आहे की, इंटरनेट-संबंधित सेवा 23 मार्च 2024 रोजी दुपारी 01:10 ते दुपारी 02:10 दरम्यान उपलब्ध नसणार. माहिती देताना बँकेने सांगितले की, यादरम्यान ग्राहक इंटरनेट बँकिंग, YONO Lite, YONO Business Web आणि Mobile App, YONO आणि UPI या सेवा वापरू शकणार नाहीत. मात्र UPI Lite आणि ATM सेवा वापरता येतील.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कसं करता येईल पेमेंट?

बँकेने सांगितले की, उद्या म्हणजेच 23 मार्च रोजी दिलेल्या वेळेत कोणताही ग्राहक UPI वापरू शकणार नाही. मात्र UPI Lite वापरून पेमेंट केले जाऊ शकते. यासोबतच एखादी व्यक्ती एटीएम मशिनमध्ये जाऊन पैसे काढू शकते. (Latest Marathi News)

किती लोक एसबीआय डिजिटल सेवा वापरतात?

आपल्या तिसऱ्या तिमाहीचे रिपोर्टमध्ये एसबीआयने म्हटले होते की, बँकेचे भारतात 81,000+ BC आउटलेटसह 22,400+ शाखा आणि 65,000+ ATM/ADWM चे नेटवर्क आहे. यासह बँकेचे 125 मिलियन ग्राहक इंटरनेट बँकिंग आणि 133 मिलियन ग्राहक मोबाइल बँकिंग सेवेचा वापर करतात. याशिवाय तिसऱ्या तिमाहीत, एसबीआयमध्ये YONO द्वारे 59 टक्के खाती उघडण्यात आली आणि एकूण 7.05 कोटींहून अधिक युजर्स त्यावर नोंदणीकृत आहेत.

माहिती हवी असल्यास कुठे संपर्क कराल?

ग्राहकांना कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास किंवा कोणतीही माहिती मिळवण्याची आवश्यकता असल्यास बँकेने यासाठी देखील मार्ग उपलब्ध करून दिला आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक अशा कोणत्याही सुविधेसाठी एसबीआयच्या टोल फ्री क्रमांक 1800 1234 आणि 1800 2100 वर कॉल करू शकतात. याशिवाय एसबीआयच्या वेबसाइटवर जाऊनही आपल्याला हवी असलेली माहिती मिळवू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: MIM ला ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात पहिला धक्का, पक्षाच्या बड्या नेत्याचा राजीनामा

Jharkhand Election : काँग्रेसची पहिली यादी आली; 21 उमेदवार जाहीर, कुणाला कुठून मिळाली उमेदवारी? संपूर्ण यादी पाहा

Maharashtra Politics : मोठी बातमी! शेतकरी कामगार पक्षाकडून ४ उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली उमेदवारी? वाचा

Assembly Election: अजित पवार गटाला मोठा धक्का; अजित यशवंतराव यांचा ठाकरे गटात 'विदाऊट' तिकीट प्रवेश

Ramdas Kadam : रामदास कदम यांचा शरद पवार आणि मविआवर हल्लाबोल; पाहा Video

SCROLL FOR NEXT