SGRTD Scheme Saam Digital
बिझनेस

SGRTD Scheme: SBI ने केली खास योजनेची घोषणा, कसा मिळवाल फायदा? जाणून घ्या

SGRTD Scheme: देशातील सर्वात मोठी बँक असेलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एक विशेष मुदत ठेव योजना सुरू केली आहे. SBI या योजनेतून ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट (SGRTD) अंतर्गत पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देश आहे.

Sandeep Gawade

SGRTD Scheme

देशातील सर्वात मोठी बँक असेलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एक विशेष मुदत ठेव योजना सुरू केली आहे. SBI या योजनेतून ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट (SGRTD) अंतर्गत पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देश आहे. यातून भारतातील ग्रीन फाइनेंस इकोसिस्टम विकासाला चालना मिळणार आहे. गुंतवणूकदारांसाठी ही योजना लाभदायक ठरणार असून आज आपण ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट (SGRTD) या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.

गुंतवणूक कोण करू शकतं: SBI ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट योजना निवासी व्यक्ती, अनिवासी आणि NRI ग्राहकांसाठी आहे.

किती दिवसांची योजना आहे: SGRTD गुंतवणूकदारांना 1111 दिवस, 1777 दिवस आणि 2222 दिवस अशा तीन वेगवेगळ्या कालमर्यादा निवडण्याची सुविधा देते

कशी कराल गुंतवणूक?: सध्या ही योजना ब्रांच नेटवर्कवर उपलब्ध असून लवकरच YONO आणि इंटरनेट बँकिंग सेवां सारख्या(INB) इतर डीजिटलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल.

रिटेल डिपॉझिटवर व्याज किती मिळेल: 1111 आणि 1777 दिवसांच्या रिटेल डिपॉझिट स्कीमवर 6.65 टक्के व्याज दिले जाईल आणि 2222 दिवसांच्या स्कीमवर 6.40 टक्के व्याज दिलं जाणार आहे.

बल्क डिपॉझिटवर व्याज किती मिळेल: किरकोळ ठेवीमध्ये, 1111 आणि 1777 दिवसांच्या योजनेवर 6.15 टक्के व्याज दिले जाईल आणि 2222 दिवसांच्या योजनेवर 5.90 टक्के व्याज दिलं जाणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त लाभ: ज्येष्ठ नागरिक/स्टाफ/स्टाफ ज्येष्ठ नागरिक लागू असलेल्या दरापेक्षा अतिरिक्त व्याजदरासाठी पात्र असणार आहेत

मुदतपूर्व पैसे काढता येतात का: या योजनेत गुंतवणूकदार मुदतीपूर्वी त्यांचे पैसे काढू शकतात.

मार्गदर्शक तत्त्वे: या योजनेतील मुदतठेवी आणि विशेष एफडींना लागू होणारी सर्व मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील.

ठेव रकमेवर कर्ज सुविधा: योजनेतील ठेव रकमेवर कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे

TDS: आयकर नियमांनुसार TDS लागू करण्यात येणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT