SBI Hikes Fixed Deposit Rates Saam tv
बिझनेस

SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! FD वर मिळणार जास्तीचं व्याज, चेक करा नवे दर

SBI Hikes Fixed Deposit Rates : स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. हा व्याजदर ₹ 2 कोटींपेक्षा कमी एफडीवर लागू करण्यात आला आहे. अशातच नवीन व्याजदर हा २७ डिसेंबर २०२३ पासून लागू करण्यात येईल.

कोमल दामुद्रे

SBI Hike FD Rate :

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना नवीन वर्षाच्या आधीच आनंदाची बातमी दिली आहे. सध्या भारतात मुदत ठेव अधिक लोकप्रिय आहे. एफडीमध्ये सध्या लोकांचे आकर्षण अधिक प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.

अशातच स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मुदत ठेवींवरील व्याजदरात (Interest) वाढ केली आहे. हा व्याजदर ₹ 2 कोटींपेक्षा कमी एफडीवर लागू करण्यात आला आहे. अशातच नवीन व्याजदर हा २७ डिसेंबर २०२३ पासून लागू करण्यात येईल.

यामध्ये बँकेने १ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी, २ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी आणि पाच वर्ष ते दहा वर्ष सोडून इतर एफडीवर व्याजदर वाढवला आहे.

1. सध्याचा व्याजदर किती?

सात दिवसांपासून ते पंचेचाळीस दिवसांत एसबीआयने दरामध्ये ५० बेसिस पॉइंट्सने वाढवले आहे. आता या मुदत ठेवीवर ग्राहकांना ३.५० टक्के व्याजदर मिळेल. ४६ दिवस ते १७९ दिवसांसाठी, बँकेने (Bank) दर २५ bps ने वाढवले आहेत. यामध्ये ग्राहकांना ४.७५ टक्के व्याजाची हमी देण्यात आली आहे. तसेच १८० ते २१० दिवसांच्या मुदत ठेवीवर एसबीआयने दर ५० bps ने वाढवले आहेत. या एफडीवर ५.७५ टक्के व्याज मिळेल.

बँकेने १ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ६ टक्के देत असून यामध्ये २११ दिवसांचा कालावधी आहे यामध्ये २५ bps वाढवला आहे. ३ ते ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीसाठी २५ bps असणार आहे तर यामध्ये व्याजदर हा ६.७५ टक्के असणार आहे.

2. आजपासून ग्राहकांना मुदत ठेवीवर कसा मिळेल व्याजदर

  • ७ दिवस ते ४५ दिवस- ३.५० टक्के

  • ४६ दिवस ते १७९ दिवस ४.७५ टक्के

  • १८० दिवस ते २१० दिवस ५.७५ टक्के

  • २११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी ६ टक्के

  • १ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी ६.८० टक्के

  • २ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी ७ टक्के

  • ३ वर्षे ते ५ वर्षांपेक्षा कमी ६.७५ टक्के

  • ५ वर्षे आणि १० वर्षांपर्यंत ६.५० टक्के

3. ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI FD दर

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ५० बेसिस पॉइंट्स (bps) जास्तीचे मिळतील. सध्याच्या वाढीनंतर, SBI सात दिवसांपासून ते दहा वर्षाच्या मुदत ठेवींवर ४ ते ७.५ टक्के पर्यंत ऑफर करते.

  • ७ दिवस ते ४५ दिवस- ४ टक्के

  • ४६ दिवस ते १७९ दिवस - ५.२५ टक्के

  • १८० दिवस ते २१० दिवस - ६.२५ टक्के

  • २११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी - ६.५ टक्के

  • १ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी ७.३० टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: पगार ५०,००० वरुन १,००,००० होणार; आठव्या वेतन आयोगानंतर सॅलरीचं कॅल्क्युलेशन वाचा

Worst foods to eat with eggs: चुकूनही अंड्यासोबत हे ५ पदार्थ नाश्त्यामध्ये खाऊ नका

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Local Body Election: प्रचार जोरात होणार! इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

Halloween : हॅलोवीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT