SBI Fraud Saam Tv
बिझनेस

SBI Fraud: स्टेट बँकेला कर्मचाऱ्यांनीच गंडवलं, तब्बल २,१२२ कोटींची फसवणूक

SBI Fraud News: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेल्या वर्षभरात तब्बल २,१२२ कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. ऑनलाइन अॅप, यूपीआयद्वारे ही फसवणूक करण्यात आली आहे.

Siddhi Hande

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियात आपले पैसे सुरक्षित असतात असे प्रत्येक नागरिकाला वाटत असते. त्यामुळे अनेक नागरिकांनी या सरकारी बँकेत आपली खाती उघडली आहेत. परंतु याच बँकेत कोट्यवधींची फसवणूक झाली आहे. हजारो कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळले आहे. तब्बल २,१२२ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियात गेल्या आर्थिक वर्षात 2,122 कोटींची फसवणूक झाली आहे. माहिती अधिकारातून माहिती उघडकीस आली आहे. स्टेट बँकेच्या देशभरातील शाखांमध्ये फसवणुकीची एकूण संख्या 13,782 एवढी आहे.

सायबर गुन्हेगारांनी 10 हजार 260 प्रकरणांमध्ये ही फसवणूक केली आहे. तब्बल 66.70 कोटींची फसवणूक केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीचे अधिकारात ही माहिती प्राप्त केली आहे.जवळपास 5,002 लोकांची फसवणूक झाली आहे. या फसवणूकीतून 37.26 कोटींची रुपये उकळण्यात आले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे.

याशिवाय यूपीआयच्या माध्यमातून 4,829 लोकांकडून 26.46 कोटी रुपये घेतले आहे. एइपीएस ने 265 लोकांची 46 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. तर स्टेट बँकेचे स्वतःचे मोबाईल ऍप 'योनो'वरुन 156 जणांची 2.34 कोटींची फसवणूक झाली आहे

खुद्द स्टेट बँकेच्या 100 कर्मचाऱ्यांनीच 7.98 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे दिलेल्या उत्तरात उघड झाले आहे. यासोबतच स्टेट बँकेच्या देशात 31 मे 2025 पर्यंत एकूण 22,962 शाखा असून अध्यक्षांसह एकूण 2 लाख 35 हजार 773 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Triekadash Yog 2025: १५ ऑगस्टपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु; बुध-मंगळ तयार करणार पॉवरफुल योग

Todays Horoscope: आज रक्षाबंधन असून आर्थिक निर्णय मार्गी लागतील; वाचा आजचं राशीभविष्य

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

SCROLL FOR NEXT