SBI Chocolate Scheme: Saam Tv
बिझनेस

SBI Chocolate Scheme: कर्जाचा हप्ता चुकला का? चिंता नको! SBI ने आणली जबरदस्त योजना

SBI EMI Payment Reminder : कर्जाचे मासिक हप्ते चुकल्यास SBI कर्जदारांना चॉकलेट पाठवणार आहे. नेमकं काय आहे ही भन्नाट स्कीम.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

SBI Chocolate Scheme:

तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्जदार असाल आणि तुम्ही हप्ता जमा करायला विसरला असाल तर काळजी करू नका. हप्ता भरण्यासाठी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी एसबीआय तुम्हाला एक चॉकलेट देणार आहे. (Latest Business News)

बँकेतून कर्ज घेतल्यानंतर जर आपल्याकडून हप्ता चुकला तर कर्ज वसुली करणारे बँकेतील कर्मचारी आपल्याला सतत फोन करत असतात. कर्जाचा हप्ता कधी भरणार याची विचारणा करत असतात. त्या कॉलमुळे बहुतेकजणांची चीड-चीड होत असते. ही गोष्ट लक्षात घेत स्टेट बँकेनं एक भन्नाट स्कीम आणलीय. हप्ता भरण्याची वेळ ग्राहकांना लक्षात राहावी यासाठी एसबीआय बँक एक जेंटल रिमांइडर देणार आहे.

यासाठी बँक ग्राहकांच्या घरी चॉकलेटचा बॉक्स पाठवणार आहे. कर्ज घेणारे बहुतेक ग्राहक जे कर्जाचे हप्ते वेळेवर फेडत नाहीत. ते रिमाइंडर मेल किंवा बँकेचा मेसेज पाहत नाहीत. त्यामुळे त्यांचे बँकेचं क्रेडिट कमी होत असतं. परंतु एसबीआयची ही भन्नाट चॉकलेट स्कीम ग्राहकांचं क्रेडिट सुधारण्यात मदत करेल.

कर्जदारांकडून वेळेवर परतफेड व्हावी, यासाठी बँक नवीन दृष्टीकोन अवलंबत आहे. जे कर्जदार कर्जाचे हप्ते चुकवतील असा संशय बँकेला आला तेव्हा बँक त्या ग्राहकांना चॉकलेटचे पॅकेट पाठवणार आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, जे कर्जदार हप्ता चुकवतात. ते बँकेच्या रिमाइंडर कॉलला प्रतिसाद देत नाहीत, म्हणून कर्जदाराला त्याच्या घरी चॉकलेटची भेट देणं हा सर्वोत्तम मार्ग असल्याचं स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आलंय.

AI वापरणाऱ्या दोन फिनटेक कंपन्यांसह, बँकेनं किरकोळ कर्जदारांना त्यांच्या हप्त्याच्या परतफेडीची आठवण करून देण्यासाठी एक नवीन पर्याय आणलाय. एका फिनटेक कंपनीच्या माध्यमातून कर्जदारांचे कर्ज प्रकरणे मिटवली जात आहेत. तर दुसऱ्या कंपनीच्या माध्यमातून कर्जदाराच्या डिफॉल्टर वर्तनाची सूचना केल्या जात आहेत.

डिफॉल्ट होण्याची शक्यता असलेल्या कर्जदारांशी फिनटेक प्रतिनिधींद्वारे संपर्क साधला जाईल. त्या कर्जदाराला आगामी EMI भरण्याची आठवण करून देण्यासाठी त्यांना चॉकलेटचे पॅकेट दिलं जाईल, असं एसबीआयच्या मालमत्ता जोखीम प्रकरणांचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार तिवारी म्हणाले.

जे कर्जदार ईएमआय डिफॉल्ट करतात. ते बँकेच्या रिमाइंडर कॉलला प्रतिसाद देत नाहीत, अशा परिस्थितीत त्यांना न सांगता त्यांच्या घरी भेटणं आणि त्यांना आश्चर्यचकित करणं हा उत्तम मार्ग आहे. दरम्यान १५ दिवसांपूर्वी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्तम यश मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT