Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यात पावसाची विश्रांती, पिंपरी चिंचवडमधील मोशीत बचावकार्य सुरूच, आषाढी वारी अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news
Published On

धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

पूजा जाधव ,पल्लवी सौदागर या दोन नर्सेस ला विषबाधा

पूजा जाधव या सिरीयस लातूर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल ला अतिदक्षता विभागात उपचार सुरू

पल्लवी सौदागर यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू.

यवत मध्ये सुप्रिया सुळे यांनी थापल्या वारकऱ्यांसाठी भाकऱ्या

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात मुक्कामी आहे यवत मध्ये ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांना पिठलं भाकरी ची खास मेजवानी दिली जाते.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिरात उपस्थिती लावत या ठिकाणी महिलांबरोबर वारकऱ्यांसाठी भाकऱ्या थापल्या आहेत. याशिवाय आहेस सुप्रिया सुळे यांनी पिठलं भाकर खाण्याचा आस्वाद देखील घेतला आहे.

आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी मार्गावर एक क्विंटल फुलांनी साकारली विठ्ठल - रुक्मिणीची दहा फूट उंच मूर्ती

बीडमध्ये काल आदिशक्ती मुक्ताईची पालखी दाखल झाली. या पालखीचा दोन दिवस मुक्काम बीडमध्ये असतो.आज दुसऱ्या दिवशी बीड शहरातून या पालखीची मिरवणूक काढली जाणार आहे.याच अनुषंगाने पालखी मार्गावर विविध ठिकाणी सजावट करण्यात आल्याने पालखी मार्गावर भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.

याच पालखी मार्गावर असलेल्या धोंडीपुरा येथे एका कलाकारांकडून विठ्ठल रुक्मिणीचे तब्बल दहा फुटांची मूर्ती साकारण्यात आली आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी एक क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला असून.ही मूर्ती आकर्षणाचे केंद्र बनल्याने या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी त्याचबरोबर आपल्या कॅमेरा मध्ये विठ्ठल रुक्मिणीचे हे आकर्षक रूप कैद करण्यासाठी भाविकांनी गर्दी केलीय.

कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणाला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चेतन हरगुडे गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून अपघातापुर्वी चेतनचा बैलगाडा घाटात वाद झाला होता या वादानंतर अपघात झाल्याने या अपघातावर शंका उपस्थित होत आहे.

वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा;कळंबमध्ये नाभिक बांधवांचा 13 वर्षांपासून सेवायज्ञ

शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली असून कळंब शहरात पालखीचा मुक्काम आहे. पालखीसोहळा म्हटला की भक्ती, नामस्मरण आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो.त्याच सेवाभावाचे जिवंत उदाहरण कळंब शहरातील नाभिक बांधव दरवर्षी घालून देत आहेत. शहरातील नभिक बांधवांचं सेवेचा हे तेराव वर्ष असून गजानन महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी ते पूर्णपणे मोफत दाढी आणि केस कापण्याची सेवा देतात आणि शेकडो वारकरी या सेवेचा लाभ घेतात.

कळंब शहरात संत गजानन महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत

शेगाव येथील संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी दिंडी धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कळंबकरांनी पालखीचे उत्साहात स्वागत करत वारकऱ्यांवर फुलांची उधळण केली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. ही पालखी नगरपरिषदेच्या मैदानावर दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. वारकऱ्यांच्या जयघोषाने कळंब नगरी दुमदुमून गेली.

माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाले

माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाले

० पुण्यातून 17 जणांचा गृप पावसाळी पर्यटनासाठी आला होता फिरायला

० बंदी असताना देखील धबधब्याखाली आनंद घेत असताना दोघे बुडून बेपत्ता

० माणगाव पोलिसांचे पथक घटनास्थळाकडे रवाना

० देवकुंड धबधब्यासह माणगाव मधील वर्षा पर्यटन स्थळांवर निर्बंध असताना पर्यटकांचा अतिरेक

० बंदी असतानाही पर्यटक धबधब्यावर पोहोचले कसे ?

असा प्रश्न होत उपस्थित

एटापल्लीत पुन्हा नक्षलवादी हालचालींची चाहूल; कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळल्याने खळबळ

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कुंडम गावाजवळ नक्षलवादी आशयाचे बॅनर आणि पत्रके आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शहादा समाज कल्याण वस्तीगृहात 40 विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

बाधित 40 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती...

विषबाधा प्रकरण अखेर शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

जेवण तयार करणारा ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल...

वस्तीगृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अध्यापही गुन्हे दाखल न झाल्याने पालकांमध्ये संताप....

या प्रकरणात आणखी कोणी दोषी असल्यास त्याच्यावर ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी दिली आहे...

कल्याणहून जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत

आसनगांवकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत

दौंड तालुक्यातील यवत येथे वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरीचे जेवण

दौंड तालुक्यातील यवत येथील काळभैरवनाथ मंदिरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पिठलं भाकरीच्या जेवणाची मेजवाणी . .

यासाठी यवत ग्रामस्थ घरून भाकरी घेऊन येतात.. याबरोबरच काळ भैरवनाथ मंदिर येथे मोठ्या प्रमाणावर भाकरी बनवण्याचं काम सुरू असतं.

मोठ्या कढयांमध्ये पिठंल बनविण्याच काम सुरू आहे .

खालापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात गर्भवती महिलेला झोळीचा आधार

खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या ऊंबरणे आदिवासी वाडी येथील गर्भवती महिलेला झोळीचा वापर करून उपाचारासाठी दवाखान्यात नेहत असतानाचे भीषण वास्तव समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे विकासाच्या गप्पा करणारे राज्यकर्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

-पावसा अभावी कृषी दुकानदार चिंतेत

नाशिकच्या पूर्व भागात जून महिन्यात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या,त्याचा फटका कृषी दुकानदराना बसला आहे आद्यप ही पुरेसा पाऊस नसल्याने कृषी दुकानदारांच्या विक्रीला ब्रेक बसला असून अशीच परिस्थिती राहिल्यास लाखोंचा माल पडून राहण्याची भीती कृषी दुकानदारांनी व्यक्त केलीय

काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांच्यावर माजी खासदार नवनीत राणा यांची टीका.

मी कधी शासकीय कार्यक्रमात मंचावर जात नसते.मी माजी खासदार झाल्यामुळे मनाला नेहमी वेदना असतात

शेरनी अगर शांत है तो डकारणा कभी छोडती नही...हे लक्षात ठेवा -नवनीत राणा यांचं खासदार बळवंत वानखडे यांना आव्हान

जे निवडून आले त्यांना मी नेहमी शुभेच्छा दिल्या आहे ,महिला बद्दल बोलत असताना मर्यादा असल्या पाहिजे मी माझी मर्यादा केव्हा विसरत नाही

मी माझ्या विचारांची पक्की आहे. माझी विचारधारा मी सोडणार नाही दुसऱ्याच्या दारात मी खासदारकीसाठी गेली नाही

साऊंड बाईट-नवनीत राणा, माजी खासदार तथा भाजप नेत्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन नतमस्तक होत माऊलींचे आशीर्वाद घेतले.

Vo :- यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाशी असलेले आपले भावनिक नाते अधोरेखित करत, अजित पवार यांचाही वारकऱ्यांशी जिव्हाळ्याचा संबंध असल्याचे सांगितले. वारकऱ्यांना दर्शन सुलभ व सुखकर व्हावे, तसेच पालखी मार्ग अधिक सुविधायुक्त करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यंदा एल निनोमुळे दुष्काळाचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, राज्याला या संकटातून मुक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी माऊलींच्या चरणी केली.

जन्मत: दात असलेल्या कमी वजनाच्या चिमुकल्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

जन्मानंतर अवघ्या एका महिन्याच्या मुदतपूर्व (Premature) आणि केवळ १.१९६ किलोग्राम वजनाच्या नवजात बाळाच्या तोंडात जन्मत:च असलेले दात (Natal Teeth) आढळून आले. या दुर्मिळ परिस्थितीत बाळाच्या आरोग्याची विशेष काळजी घेत, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने NICU मध्ये हे दात यशस्वीपणे काढून बाळाला संभाव्य धोक्यापासून सुरक्षित केले. ही शस्त्रक्रिया शुक्रवारी (१० जुलै) पार पडली.

फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुन गिरीजा गितेश राऊत यांनी केलेल्या जादूटोणा आणि अघोरी कृत्याच्या आरोपानंतर या प्रकरणातील तपासाला वेग आला असून, सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज आदम शेख याला ठाणे पोलिसांनी काल सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे.

सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

सिडकोणी चार महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाहीये

त्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे चार महिन्यापासून अडकून पडले आहे

सोडत लांबणीवर पडल्यामुळे सिडको धारक नाराज आहेत

16876 घरांची सोडत लांबीवर पडल्या असल्यामुळे अडकलेले पैसे कधी मिळणार असा सिडको धारक विचारत आहेत

श्रीरामपूरमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि व्यापारी पोलिस ठाण्यात...

श्रीरामपूरमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि व्यापारी पोलिस ठाण्यात...

श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात ठिय्या सुरू...

काल एका युवकाची भर दिवसा झाली होती निर्घृण हत्या...

लोणावळ्यात पावसाचा जोर ओसरला

लोणावळ्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा वेग कमी झाला आहे. मात्र रविवारची सुट्टी असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात भुशी धरणावर दाखल....

खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

रायगडच्या खालापूर येथील इमॅजिका वॉटर पार्कमध्ये पावसाळी पर्यटना करिता आलेल्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. कपिल शांताराम पाटील वय वर्ष 47 राहणार बदलापुर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. इमॅजिकामध्ये फिरत असताना कपिल यांना अचानक चक्कर आली आणि ते जागीच कोसळले. मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहीत समोर आली आहे.

पावसाळी पर्यटनासाठी कोंडेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

पावसाळी पर्यटनासाठी कोंडेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

मुंबई-ठाण्याच्या पर्यटकांमुळे कोंडेश्वर हाऊसफुल्ल

पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना काळजी घेण्याचं आवाहन

Mumbai Taj Hotel : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

मुंबई पोलिसांना ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

मुंबई पोलीस हाय अलर्टवर

सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासाठी दोन अश्व सज्ज

सासवड नगरीतून निघणाऱ्या सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासाठी परंपरेनुसार दोन अश्व सज्ज करण्यात आले आहेत.

त्यापैकी एका अश्वावर संत सोपानकाकांच्या पादुकांचे प्रतीकात्मक विराजमान होणार आहे.

Pandharpur : स्मशानभूमीच्या वादातून ग्रामपंचायत; कार्यालयासमोर अंत्यविधी करण्याचा प्रयत्न

माळशिरस तालुक्यातील फळवणी येथे स्मशानभूमीच्या जागेचा वाद असल्याने ग्रामस्थांना ग्रामपंचायत समोर अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे.

अमरावतीत युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह

अमरावतीत युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह.

राममंदिर देणगी चोरी प्रकरणी खऱ्या दोषींना शिक्षा देण्याची मागणी

पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

वाढ खुंटली, पीक करपण्याच्या उंबरठ्यावर; नजरा आकाशाकडे

Pune : सासवडमध्ये संत सोपानकाका महाराजांच्या पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी

सासवड नगरीत भक्तीचा महासागर उसळला आहे. संत सोपानकाका महाराजांचा पालखी रथ प्रस्थानासाठी सज्ज झाला

टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात वारकरी विठ्ठलनामात दंग झाले

अवघ्या काही क्षणांत संत सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान होईल

पंढरपूरमध्ये 4000 वारकऱ्यांची सायकलवारी

पंढरपूर मध्ये आज सायकल दिंड्या दाखल झाल्या आहेत. नागपूर ,नाशिक, जळगाव , कोल्हापूर , सांगली , पुणे , ठाणे अशा 17 जिल्ह्यातून आलेल्या सायकल स्वरांची एकत्रित आज पंढरपूर शहरातून सकाळी दिंडी काढली.

पर्यावरणाचा संदेश देणारे तब्बल 4 हजार सायकल स्वार सायकल दिंडीत सहभागी झाले होते.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मंजूर केला

महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी करत केला सन्मान

Pandharpur: पंढरपूरमध्ये 4000 वारकऱ्यांची सायकलवारी

पंढरपूर -

पंढरपूरमध्ये 4000 वारकऱ्यांची सायकलवारी

पंढरपूर मध्ये आज सायकल दिंड्या दाखल झाल्या आहेत.

नागपूर ,नाशिक, जळगाव , कोल्हापूर , सांगली , पुणे , ठाणे अशा 17 जिल्ह्यातून आलेल्या सायकल स्वरांची एकत्रित आज पंढरपूर शहरातून सकाळी दिंडी काढली.

पर्यावरणाचा संदेश देणारे तब्बल 4 हजार सायकल स्वार सायकल दिंडीत सहभागी झाले होते.

गेल्या सहा वर्षापासून पंढरपुरात सायकल दिंडी आणि सायकल वारीचा आयोजन केले जाते.

Ahilyanagar: वाढत्या गुन्हेगारी विरोधात व्यापाऱ्यांसह सर्व पक्षीय एल्गार

अहिल्यानगर -

वाढत्या गुन्हेगारी विरोधात व्यापाऱ्यांसह सर्व पक्षीय एल्गार

श्रीरामपूर शहर बंद ठेवत पोलीस प्रशासनाचा निषेध...

श्रीरामपूर बंदला शंभर टक्के प्रतिसाद..

शहरातील सर्वच आस्थापना पूर्णपणे बंद...

बंदला व्यापारी वर्गाचा मोठा प्रतिसाद..

गेल्या अकरा दिवसात प्राणघातक हल्ल्याच्या चार विविध घटना..

तर काल दुपारी भर दिवसा एका हॉटेल चालकाची हत्या...

वाढत्या गुन्हेगारी विरोधात बंदची हाक...

Navi Mumbai: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

नवी मुंबई -

सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

सिडकोणी चार महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाहीये

त्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे चार महिन्यापासून अडकून पडले आहे

सोडत लांबणीवर पडल्यामुळे सिडको धारक नाराज आहेत

16876 घरांची सोडत लांबीवर पडल्या असल्यामुळे अडकलेले पैसे कधी मिळणार असा सिडको धारक विचारत आहेत

Nagpur: मिहानमधील एरोस्पेस हबला मोठी चालना, नागपूर जागतिक विमान निर्मितीच्या नकाशावर झळकणार

नागपूर -

- मिहानमधील एरोस्पेस हबला मोठी चालना, नागपूर जागतिक विमान निर्मितीच्या नकाशावर झळकणार

- 'फाल्कन २००० एलएक्सएस' विमानाची निर्मिती आता नागपुरात

- मिहानमधील डीआरएएलमध्ये फायनल असेंब्ली लाईनसाठी हँगर आणि वर्कशॉपचे बांधकाम सुरू

- फ्रान्सबाहेर डसॉल्टची ही पहिलीच फाल्कन फायनल असेंब्ली लाईन

- २०२८ मध्ये नागपुरातून पहिले पूर्ण 'फाल्कन' विमान बाहेर पडणार

- इंजिन, फ्लाइट कंट्रोल आणि सर्व इलेक्ट्रॉनिक प्रणालींचे इंटिग्रेशन नागपुरातच होणार

- अंतिम चाचणी, सर्टिफिकेशन आणि ग्राहकांना विमानाची डिलिव्हरीही नागपुरातूनच

- 'फाल्कन ६एक्स' आणि 'फाल्कन ८एक्स' विमानांचीही भविष्यात नागपुरात असेंब्ल होणार

- या प्रकल्पामुळे संपूर्ण बिझनेस जेट विमाननिर्मिती करणाऱ्या मोजक्या देशांत भारताचा समावेश

Bhandara: भंडाऱ्यात बीटीबी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना जिल्हा न्यायालयाचा मोठा दिलासा

भंडारा -

भंडाऱ्यात बीटीबी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना जिल्हा न्यायालयाचा मोठा दिलासा

व्यापाऱ्यांना बाजाराबाहेर काढण्याच्या नगरपालिकेच्या कारवाईला न्यायालयानं दिली स्थगिती

Dharashiv: तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

धाराशिव -

तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

पुजाऱ्यांचे प्रश्न घेऊन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट

ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंकडून जिल्हाधिकाऱ्यांना फोन

"तुळजाभवानी मंदिराचे सर्व कामकाज पुजाऱ्यांना विश्वासात घेऊनच करा, मंदिराची परंपरा, पावित्र्य आणि धार्मिक भावना अबाधित ठेवत भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या."

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Pune:  पुण्यात सदाशिव पेठेत दुकानाला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

पुणे

पुण्यात सदाशिव पेठेत दुकानाला आग

आगीचे कारण समजले नाही

पाच मजली इमारत असलेल्या भागात पहिला व दुसरा मजला दुकानाचा आहे,दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर आयक्रॅलिक मशीन, कच्चे सामान, पीओपी, वायरिंग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पंधरा ते वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले, मदती करता एरंडवणा गाडी आली होती.

अंदाजे नुकसान समजले नाही.

जीवितहानी नाही .

Amravati: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

अमरावती -

सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

सोयाबीनचे 7 नमुने ठरले अप्रामानित,500 हुन अधिक शेतकऱ्यांनी केल्या होत्या तक्रारी..

शेतकऱ्यांच्या तक्रारी नंतर कृषी विभागाने पोलिसांत दिली होती तक्रार...

बूस्टर कंपनीचे अडीच हजार क्विंटलहुन अधिक बियाणे जिल्ह्यात..

प्रयोगशाळेत सोयाबीन बियाणे नेल्यानंतर धक्कादायक माहिती समोर.

Pandharpur: गोपाळरपूर येथील पूलाचे संरक्षक कठडे तुटलेले, भाविकांचा जीव धोक्यात

पंढरपूर -

गोपाळरपूर येथील पूलाचे संरक्षक कठडे तुटलेले

भाविकांच्या जीवाला धोका

पंढरपूर जवळच्या गोपाळपूर येथील पूल‌ धोकादाय बनला असून पुलाचे संरक्षक कठडे आणि बॅरिकेटी तुटलेले आहे.

आषाढी वारी काळात भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Pune: आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

पुणे -

आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या आठ हजार शिक्षकांचा पगार कापणार शिक्षण विभागाचा निर्णय

९ जुलै रोजी झालेल्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या८ हजार ६२९ शिक्षकांचा एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांनी संदर्भातली माहिती दिली आहे

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या भूमिकेतून शासनाने आंदोलनात सहभागी होणारे शिक्षक कर्मचाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले होते

९ जुलैच्या आंदोलनापूर्वीच कुठलीही शाळा बंद राहून असे स्पष्ट निर्देश दिले होते तरीही काही शाळा बंद राहिल्याने केली कारवाई ...

Pune: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ.

पुणे -

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ.

पालखी मार्गावर 271 टन कचऱ्याचे संकलन

पालखी मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती

या मोहिमेत महापालिकेच्या १ हजार १२० सेवकांनी ही सेवावारी केली

संकलित कचऱ्यामध्ये 54 टन ओला तर 217 टन सुकाकचरा होता

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने पार पाडली जबाबदारी..

Pune: अतिवृष्टीनंतर उत्तर पुण्यात उघडीप; सह्याद्रीत निसर्गसौंदर्य खुलले

पुणे -

अतिवृष्टीनंतर उत्तर पुण्यात उघडीप; सह्याद्रीत निसर्गसौंदर्य खुलले

खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले होते.

मात्र, आता पावसाने उघडीप दिल्याने वातावरणात मोठा बदल जाणवत आहे.

Nandurbar: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

नंदुरबार-

शहादा शहरातील शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरण

शहादा शासकीय रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी दाखल

जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थी आणि पालकांशी साधला संवाद

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची केली विचारपूस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com