स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. स्टेट बँक ही सरकारी बँक आहे. या बँकेच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला सुरक्षित आणि चांगला परतावा मिळतो. बँक नेहमीच ग्राहकांसाठी वेगवेगळी एफडी योजना राबवत असते. स्टेट बँकेची अमृत कलश योजना ही लोकप्रिय झाली आहे. ही ४०० दिवसांची एफडी स्कीम आहे.
या योजनेत तुम्हाला खूप कमी कालावधीत चांगला परतावा मिळणार आहे. अमृत कलश एफडी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे. (SBI Amrit Kalash Yojana)
स्टेट बँक ऑफ इंडियाची ही सर्वात कमी कालावधीची योजना आहे. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदरदेखील मिळते. या योजनेत सर्वसामान्यांना ७.१० टक्के व्याजदर मिळते तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याजदर मिळते. या योजनेतील गुंतवणूक सुरक्षित आहे. (SBI Scheme)
स्टेट बँकेची ही योजना खूप जास्त लोकप्रिय आहे. २०२३ मध्ये ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेत गुंतवणूकीसाठी अनेकदा डेडलाइन देण्यात आल्या होत्या. मात्र, या योजनेत गुंतवणूक सुरुच होती. म्हणून या योजनेत गुंतवणूकीची शेवटची तारीख सतत बदलण्यात आली आहे. या योजनेत आता तुम्ही ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करु शकतात. त्यामुळे गुंतवणूकीसाठी तुमच्याकडे फक्त २० दिवस उरले आहेत.
स्टेट बँकेच्या या योजनेत जर तुम्ही १ लाख रुपये गुंतवले तर वर्षाला ७,१०० रुपये व्याज मिळवू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना ७,६०० रुपये व्याज मिळेल. ही योजना ४०० दिवसांनी मॅच्युअर होणार आहे. या योजनेत जर १० लाख रुपये गुंतवणूक केली तर वर्षाला ७१००० रुपये व्याज मिळणार आहे.
अमृत कलश एफडी योजनेत तुम्हाला मासिक, तिमाही आणि सहामाही आधारावर व्याज मिळते. या योजनेत टीडीएस इन्कम टॅक्सच्या नियमानुसार लागू केली जाते. या योजनेत तुम्ही स्टेट बँकेच्या अॅपद्वारे अर्ज करु शखतात. याचसोबत ब्रँचमध्ये जाऊनदेखील फॉर्म भरु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.