Saving Account Saam tv
बिझनेस

Saving Account Limit: बँक खात्यात किती रक्कम ठेवावी? मर्यादेपेक्षा जास्त रक्कम ठेवल्यास मिळू शकते आयकर नोटीस

Saving Account: बँकेत सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवणे हे सुरक्षित मानले जाते. बँकेत सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवण्याची मर्यादा असते. या मर्यादेपेक्षा तुम्ही जास्त पैसे ठेवल्यास तुम्हाला आयकर विभागाची नोटीस मिळू शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Saving Account Money Limit:

सध्या प्रत्येक व्यक्तीचे बँकेत अकाउंट असते. अनेकांचे सेव्हिंग अकाउंट असते. ज्यात आपले पैसे असतात. नेहमी सेव्हिंग अकाउंटमधून पैसे काढले जातात. परंतु या सेव्हिंग अकाउंटमध्ये किती पैसे असावे याची एक लिमिट आहे. सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही किती पैसे ठेवू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Latest News)

एका आर्थिक वर्षात तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे जमा होतात याचा रेकॉर्ड आयकर विभागाकडे असतो. जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त पैसे अकाउंटमध्ये ठेवत असाल तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस मिळू शकते.

रोख ठेव म्हणजे तुमच्या बँक खात्यात मॅन्युअली, मनी ट्रान्सफर किंवा एटीएमद्वारे पैसे जमा करणे. लोक आपले पैसे सुरक्षित राहावे यासाठी बँकेमध्ये पैसे जमा करतात. यामध्ये तुम्ही पैसे डिपॉझिट केल्यानंतर काढू शकता.

आयकर विभागानुसार, एका आर्थिक वर्षात तुम्ही तुमच्या बचत खात्यात १० लाख रुपये जमा करु शकता. सर्व बँका किंवा फायनान्शियल संस्थांना मोठ्या रोख ठेवींबद्दल आयकर विभागाला कळवावे लागेल. आयकर विभाग तुमच्या रोख ठेवींवर लक्ष ठेवून असते. जर तुम्ही तुमच्या बचत खात्यात मर्यादेपेक्षा जास्त रक्कम ठेवली तर त्यावर तुम्हाला टॅक्स लागू होईल. त्यावर तुम्हाला पुन्हा कर भरावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा बळी, जीवघेण्या खड्ड्यांना जबाबदार कोण? महाराष्ट्र खड्ड्यात कुणी घातला?

Maharashtra News Live Update: बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या भागातील एक झाड शासकीय वाहनावर कोसळले.

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचा पत्ता बदलणार; काय असणार नवीन पत्ता?

नवीन कपडे, मोबाईल घेऊन देतो म्हणाला अन् ..." सत्ताधारी नेत्याच्या 14 वर्षीय मुलीसोबत धक्कादायक प्रकार

कंगनानंतर रामदेव बाबांनीही तोडले तारे, रामदेव म्हणतात जेन-झींमुळे भारताची बदनामी

SCROLL FOR NEXT