मार्च महिना जवळ येत आहे. तसे अनेक लोकांना कर कसा (Income Tax) भरायचा, आपले पैसे कसे वाचवायचे या चिंतेत आहेत. जुन्या कर प्रणालीमध्ये आपण जास्तीत जास्त कर वाचवू शकतो. श्रीमंत लोकं त्यांचा आयकर कसा वाचवतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण त्याबद्दल जाणून घेऊ या. (latest marathi news)
आयकर कायद्यात अशा अनेक तरतुदी आहेत, ज्यात तुम्हाला १०० टक्के रकमेवर कर सूट मिळते. श्रीमंत आणि अब्जाधीश लोक करोडो रुपयांची देणगी का देतात, याचा कधी विचार केला आहे (How To Save Tax On Donations) का? पंतप्रधान मदत निधीतून श्रीमंत लोक आपत्तीच्या वेळी मदतीसाठी का पुढे येतात? आयकर वाचवणे हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. आयकर कायद्याचे कलम 80G आणि त्याचे इतर भाग लोकांना विविध प्रकारच्या देणग्यांवर 50 ते 100 टक्के कर सूट देतात.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दान केलेल्या रकमेवर कर सुट
देशात अनेक सरकारी निधी, खाजगी ट्रस्ट आहेत. ज्यात दान केलेली रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही या निधीमध्ये कितीही रक्कम दान करू ( Save Tax On Donations) शकता. ती रक्कम तुमच्या करपात्र उत्पन्नातून कमी केली जाते आणि उत्पन्न पूर्णपणे करमुक्त राहते.
देशातील सर्वात प्रसिद्ध असा फंड म्हणजे 'पंतप्रधान मदत निधी' आहे. यामध्ये दिलेल्या देणग्या पूर्णपणे करमुक्त असतात. याशिवाय मुख्यमंत्री मदत निधी, लेफ्टनंट गव्हर्नर रिलीफ फंड, नॅशनल डिफेन्स फंड, नॅशनल चिल्ड्रन फंड, नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हार्मनी, क्लीन गंगा फंड, नॅशनल स्पोर्ट्स फंड आणि नॅशनल कल्चरल फंड यासारख्या ट्रस्ट किंवा फंडांचा समावेश (How To Save Tax) आहे.
राम मंदिराच्या देणग्यांवर टॅक्स वाचणार
अयोध्येच्या राम मंदिरासाठी मुकेश अंबानी यांनी 2.51 कोटी रुपयांची देणगी दिल्याची बातमी आपण ऐकली आहे. राम मंदिरासाठी दान केलं, तर दान केलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम करमुक्त (save tax tips) आहे. राम मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या ट्रस्टला 50 टक्के कर सूट देण्याच्या श्रेणीत येते.
जर तुम्हाला देणगीवर कर सवलत मिळवायची असेल, तर तुम्ही फक्त 2000 रुपये रोख दान करू शकता. यापेक्षा जास्त देणग्यांसाठी तुम्ही चेक, डीडी किंवा ऑनलाइन ट्रान्सफर करू (Latest utility news) शकता. देणग्यांवर कर सूट मिळविण्यासाठी, तुम्हाला ITR मध्ये पुष्टी पावती दाखवावी लागेल. या पावतीमध्ये देणगी प्राप्तकर्त्याचा पॅन कार्ड आणि नोंदणी क्रमांक असावा. देणगी देताना तुम्हाला किती सूट मिळेल हे त्या संस्था, ट्रस्ट किंवा फंडाच्या नोंदणी श्रेणीवरूनच कळू शकते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.