सणासुदीच्या काळात, अनेक बांधकाम व्यावसायिक घरांच्या बुकिंगवर उत्तम ऑफर देत असतात. घर खरेदी करताना आपण गृहकर्ज घेतो. जर तुम्हीही गृहकर्ज घेतलं असेल तर, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
गृहकर्ज घेतल्यानंतर व्याजदरात सूट मिळावी यासाठी आपण विविध गोष्टी करतो. जर आपल्यालाही लाखो रुपयांची बचत करायची असेल तर ही, बातमी खास तुमच्यासाठी आहे.
बेसिक होम लोनचे सीईओ आणि सह-संस्थापक अतुल मोंगा सांगतात, गृहकर्ज परतफेड करण्यासाठी शिस्तबद्ध राहणे खूप महत्वाचे आहे. योग्य निर्णय आणि काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या गृहकर्जावरील व्याजदर कमी होऊ शकतो. यासाठी काही टिप्स फॉलो करून पाहा.
तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवा
अतुल मोंगा म्हणतात, जर तुमचे कोणतेही कर्ज चालू असेल, तर तुम्ही त्याचा ईएमआय वेळेवर भरून आणि बिल इत्यादी वेळेवर भरून तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता. जर तुमचा क्रेडिट स्कोअर ७५० च्या वर असेल तर तुम्हाला त्याचा फायदा कर्जाच्या व्याजदराच्या स्वरूपात मिळतो.
कर्जाच्या कालावधीची निवड
तुमच्या कर्जाचा कालावधी तुमच्या एकूण व्याजाच्या गणनेवर परिणाम करतो. जर तुम्ही कमी कालावधीचे कर्ज घेतले तर तुम्हाला सहसा कमी व्याज द्यावे लागते. पण यामध्ये तुमचा मासिक हप्ता वाढेल. परंतु जर मुदत वाढवली तर मासिक हप्ता कमी होईल आणि व्याजाची रक्कम वाढेल. म्हणून, कोणत्याही कर्जाची परतफेड करण्यासाठी कमी कालावधी निवडा.
फ्लोटिंग व्याजदर
कोणतेही कर्ज घेताना, फ्लोटिंग व्याजदर निवडा. बाजारातील चढउतारांनुसार फ्लोटिंग व्याजदर बदलत राहतात. जर व्याजदर कमी असेल तर, तुम्हाला गृहकर्जात त्याचा फायदा होईल.
डाउन पेमेंट
घर खरेदी करताना डाउन पेमेंट जास्त करा. यामुळे थकबाकीची रक्कम कमी होईल आणि तुम्हाला कमी व्याज द्यावे लागेल.
नियमित परतफेड
गृहकर्जाची परतफेड करताना , तुमचे कोणतेही हप्ते चुकणार नाहीत याची खात्री करा. एकही हप्ता चुकवल्यास दंड होऊ शकतो आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.