Samsung India Launched AI Powered Ocd OLED Saam Tv
बिझनेस

Samsung AI Powered TV: TV पाहण्याचा अनुभव होणार स्मार्ट, सॅमसंगने लॉन्च केला AI पॉवर्ड टीव्ही

Samsung India Launched AI Powered Monitors and Their Price: सॅमसंग कंपनी टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात खूप पुढे गेली आहे. कंपनीने आपले पहिलेच एआय पावर्ड ओसीडी ओएलईडी लाँच केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सॅमसंग ही भारतातील इलेक्ट्रॉनिक ब्रँड आहे. सॅमसंग कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन उपकरणे लाँच करत असते. कंपनीने आज ओडीसी ओएलईडी गेमिंग मॉनिटर, स्‍मार्ट मॉनिटर्स आणि व्‍ह्यूफिनिटी मॉनिटर्सची २०२४ लाइनअप लाँच केली. या श्रेणीमध्‍ये सर्वोत्तम फीचर्स देण्यात आले आहे. हे स्मार्ट मॉनिटर्स ग्राहकांसाठी नेक्‍स्‍ट-लेव्‍हल अनुभव आणि नवीन एआय क्षमता1 अनलॉक करतात. ओडीसी ओएलईडी जी६ आणि स्‍मार्ट मॉनिटर लाइनअप अधिक सुधारित मनोरंजन फीचर्ससह लाँच केले आहे. तर एआायद्वारे तयार केलेले स्‍मार्ट मॉनिटर एम८ आणि व्‍ह्यूफिनिटी लाइनअप कनेक्‍टीव्‍हीटी वाढवत परिपूर्ण वर्कस्‍टेशनची खात्री देतात.

नवीन ओडीसी ओएलईडी मॉडेलमध्‍ये नवीन प्रोप्रायटरी बर्न-इन सेफ्टी टेक्नॉलॉजी सॅमसंग ओएलईडी सेफगार्ड+ आहे. ही टेक्नोलॉजी जगातील पहिलेच असून मॉनिटरमध्‍ये पल्‍सेटिंग हीट पाइपचा वापर करत बर्न-इनला प्रतिबंध करते. तसेच, डायनॅमिक कूलिंग सिस्‍टम जुन्‍या ग्रॅफाईट शीट पद्धतीच्‍या तुलनेत मॉनिटर गरम होण्‍यापासून संरक्षण देते. ओडीसी ओएलईडी जी६ अद्वितीय ओएलईडी पिक्‍चर क्‍वॉलिटीसह २५० नीट्सचे ब्राइटने देतो, तर फ्रीसिन्‍क प्रीमियम प्रो जीपीयू आणि डिस्‍प्‍ले पॅनेलला एकत्र ठेवत व्‍यत्‍यय, स्क्रिन लॅग व स्क्रिन टीअरिंगला दूर करते.

सॅमसंगचे नवीन ओएलईडी ग्‍लेअर फ्री तंत्रज्ञान ३ रंग अचूक ठेवते आणि रिफ्लेक्‍शन्‍स दूर करते. त्यामुळे डोळ्यांना जास्त त्रास होत नाही. तसेच इमेज शार्पनेस कायम ठेवत दिवसा प्रकाशात देखील सर्वोत्तम अनुभव देते.

मॉनिटरमध्‍ये सुपर स्लिम मेटल डिझाइन आहे, जी मॉनिटरला वेगळी ओळख देते. कोअर लायटिंग+ मनोरंजन व गेमिंग अनुभवांना अधिक उत्‍साहित करते, तर अॅम्बियण्‍ट लायटिंग स्क्रिनशी जुळून जाते. एर्गोनॉमिक स्‍टॅण्‍ड अॅडजस्‍टेबल हाइट, तसेच टिल्‍ट व स्विव्‍हल सपोर्टसह दीर्घकाळापर्यंत कामकाज सत्रांना अधिक आरामदायी करते. नवीन ओडीसी ओएलईडी मॉनिटर हा सॅमसंगची ओएलईडी मॉनिटर मार्केट लीडरशीप विस्‍तारित करण्‍यासाठी नवीन डिवाईस आहे. सॅमसंगने पहिला ओएलईडी मॉडेल लाँच केल्‍यानंतर लगेचच एका वर्षाच्‍या आत ओएलईडी मॉनिटर लाँच करण्‍यात आला आहे. यामुळे सॅमसंग कंपनीची ओएलईडी मॉनिटर्सच्‍या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. तसेच कंपनीच्‍या प्रोप्रायटरी ओएलईडी तंत्रज्ञानाचा फायदा घेणाऱ्या मॉडेल्‍ससह आपल्‍या गेमिंग मॉनिटर लाइन-अपमध्‍ये विविधता आणण्‍याप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ होते.

किंमत

• ओडीसी ओएलईडी जी६ ब्‍लॅक रंगामध्‍ये ९२,३९९ रूपंयापासून उपलब्‍ध असेल.

• स्‍मार्ट मॉनिटर सिरीज १५,३९९ रूपयांपासून उपलब्‍ध असेल.

• मॉनिटर्सची व्‍ह्यूफिनिटी श्रेणी २१,४४९ रूपयांपासून उपलब्‍ध असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

SCROLL FOR NEXT