Offer on Samsung Galaxy Z Flip 5 5G Check Details in Marathi Saam Tv
बिझनेस

Samsung Galaxy Z Flip 5 वर मिळत आहे 14000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

Huge Discount on Samsung Galaxy Z Flip 5 5G: तुम्ही जर फ्लिप फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. Samsung आपल्या Galaxy Z Flip 5 5G वर जबरदस्त सूट मिळत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Samsung Galaxy Z Flip 5 5G Discount:

तुम्ही जर फ्लिप फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. Samsung आपल्या Galaxy Z Flip 5 5G वर जबरदस्त सूट मिळत आहे. तुम्ही या फोनवर 14 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकता. यातच आज आपण यावर काय ऑफर मिळत आहे, याचबद्दल जाणून घेणार आहोत...

Samsung Galaxy Z Flip5 5G वर काय आहे ऑफर?

Samsung Galaxy Z Flip 5 स्मार्टफोनच्या 8GB/256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 99,999 रुपये आहे. मात्र जर ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डने हा फोन खरेदी केला तर त्यांना हा फोन 14 हजार रुपयांपर्यंत सूटसह मिळेल.

यासोबतच कंपनीने यावर एक्सचेंज ऑफरही देत आहे. त्यामुळे याची किंमत आणखी कमी होईल. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट, सॅमसंग स्टोअर आणि ॲमेझॉनवरून ग्राहक हा फोन सूटसह खरेदी करू शकतात. हा फोन 4 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Samsung Galaxy Z Flip5 5G स्पेसिफिकेशन

या सॅमसंग फ्लिप फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनचा प्रायमरी डिस्प्ले 6.7 इंच आहे, जो 120Hz रीफ्रेश रेट आणि 175 nits चा पीक ब्राइटनेस ऑफर करतो. याचा बाहेरील डिस्प्ले गोरिला व्हिक्टस 2 सेफ्टीसह 3.4 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे.

यात Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच फोटोग्राफीसाठी कंपनीने ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. जो 12+12MP लेन्सने सुसज्ज आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 10MP फ्रंट कॅमेरा आहे. सॅमसंगने यात 3,700 mAh बॅटरी दिली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा सॅमसंग फ्लिप फोन IPX8 बिल्ड सह येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

Besan Ladoo Recipe : ना कडक ना जास्त चिकट; 'असे' बनवा परफेक्ट खमंग बेसनाचे लाडू

Arbaaz Khan Daughter Name : खान कुटुंबात आली प्रिंसेस, अरबाज-शूराने ठेवलं लेकीचं खास नाव

SCROLL FOR NEXT