Samsung Galaxy S25 google
बिझनेस

OnePlus 13 आणि iPhone 16नंतर 200 मेगापिक्सल कॅमेरा वाला Samsung Galaxy S25 लॉन्च, प्री बुकिंग सुरू

OnePlus 13 आणि iPhone 16 नंतर आता Samsung Galaxy S25 सीरीज लॉन्च होणार आहे. सॅमसंगची ही मोस्ट अवेटेड सिरीज आहे. कंपनीने आगामी Galaxy S मालिकेसाठी प्री-बुकिंग सुरू केली आहे.

Bharat Jadhav

सॅमसंग कंपनीने Samsung Galaxy S25 सीरीज लॉन्च केलीय. तुम्ही Samsung Galaxy S25 सीरिज प्री-बुक करू शकता. किती रुपयांना तुम्ही हा फोन बुक करू शकता, हे जाणून घेऊ. नवीन Galaxy S सीरिजमध्ये अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळतील. AI ची प्रगत आवृत्ती नवीन सीरिजमध्ये येऊ शकते. जर तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल तर 1999 रुपयांची टोकन रक्कम भरून फ्लॅगशिप Galaxy S सीरिज आगाऊ बुक करू शकता.

तुम्ही हा फोन खरेदी करता तेव्हा ही रक्कम तुमच्या बिलात जोडली जाईल. हा फोन सॅमसंगच्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये 22 जानेवारी 2025 रोजी सॅन जोस, कॅलिफोर्निया येथे लॉन्च केला जाणार आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट Samsung.com वरून Samsung Galaxy S25 सीरीजची प्री-बुकिंग करू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सॅमसंग एक्सक्लूसिव्ह स्टोअरवरूनही हा फोन बुक करू शकता.

दरम्यान तुम्ही Samsung ची आगामी सीरिज Galaxy S पूर्व-आरक्षित केल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. आधी Galaxy S सीरिजमध्ये लवकर प्रवेश मिळेल. याशिवाय कंपनी 5000 रुपयांपर्यंतचे व्हाउचर देखील देत आहे. परंतु या ऑफरचा लाभ निवडक व्यवहारांवर घेता येईल. आगामी स्मार्टफोनमध्ये तुम्हाला टायटॅनियम फ्रेम मिळू शकते.

फोनमध्ये 6.9 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. Samsung Galaxy S24 नंतर आता आगामी S25 सीरिजकडून कॅमेऱ्याच्या अपेक्षा वाढल्यात. मागील सीरिजच्या तुलनेत या फोनमध्ये आणखी चांगला कॅमेरा सेटअप असणार आहे. प्रायमरी कॅमेरा 200 मेगापिक्सेलचा असू शकतो. तर दुसरा कॅमेरा 100 मेगापिक्सेल असू शकतो.

तर 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील दिला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय 50 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्सही उपलब्ध होऊ शकते. फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळू शकते. जे 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते. कंपनीने अद्याप कोणतेही फीचर, किंमत किंवा डिझाइनचा खुलासा केलेला नाही. नवीन सीरिजचे जी काही फीचर्स जाणून घेऊ. अशा परिस्थितीत सॅमसंग S25 सीरीजच्या किमतीचा अंदाज लावला तर सॅमसंग गॅलेक्सी S25 सीरीजमध्ये तीन मॉडेल लॉन्च केले जाऊ शकतात. या फोनची किंमत भारतात 1,29,999 रुपये असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ovarian Cancer Symptoms: जेवण जात नाही, झोप होत नाही; गर्भाशयाचा कॅन्सर तर नाही ना? 'ही' लक्षणं असतील तर वेळीच सावध व्हा

Jalgaon Crime : जळगाव हादरले; कुसुंबा येथे घरावर दगडफेक करत केला गोळीबार

कंपनी मॅनेजरच्या मृत्यूचं गूढ वाढलं; हत्येचा संशय? पत्नीच्या कॉल डिटेल्सवर पोलिसांचे लक्ष

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाके यांची पुन्हा आंदोलनाची हाक

Kojagiri Purnima 2025: कोजागिरी पौर्णिमेला का खास मानले जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT