Crude Oil  
बिझनेस

पेट्रोल निर्यातीवर रशियाची बंदी, १ एप्रिलपासून भारतावर काय होणार परिणाम? सोप्या शब्दात घ्या समजून

Russia petrol export ban impact on India fuel prices : रशियाने पेट्रोल निर्यातीवर बंदी घातल्यानंतर भारतात पेट्रोल-डिझेल दर वाढणार का? कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक परिस्थितीचा भारतावर होणारा परिणाम सोप्या शब्दांत जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

will petrol diesel prices rise in India after Russia decision : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात महागाईचे संकट डोकं वर काढत आहे. त्यातच आता रशियाने इंधन निर्यातीवर सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून इराणकडून ३ महिन्यांसाठी पेट्रोल निर्यातीवर बंदी घातली आहे. याचा परिणाम जगभरात होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम भारतावरही होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कारण भारत रशियाकडून २० टक्के तेल आयात करतो. त्यामुळे रशियाच्या या निर्णायामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार का? असा सवाल सर्वच देशांसमोर उपस्थित झालाय.

कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण गेल्या वर्षीइतकेच आहे. त्यामुळे तेल उत्पादनांचा पुरवठा स्थिर राहील. वाढत्या इंधनाच्या किमतींना आळा घालण्यासाठी आणि तुटवड्याचा सामना करण्यासाठी रशियाने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर वारंवार निर्बंध लादले आहेत. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक म्हणाले की, पश्चिम आशियातील संकटामुळे जागतिक तेल आणि तेल उत्पादनांच्या बाजारपेठेत निर्माण झालेल्या गोंधळामुळे किमतींमध्ये मोठे चढ-उतार होत आहेत. त्यामुळे निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतावर काय परिणाम होणार ?

पेट्रोलसारख्या तयार इंधनाऐवजी भारत कच्चे तेल आयात करतो. एकूण लागणाऱ्या इंधनापैकी भारत जवळपास ८० टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यामध्ये रशियाचा वाटा तब्बल २० टक्के इतका आहे. भारत पेट्रोल अथवा शुद्ध इंधनची आयात खूपच कमी करतो.

त्याऐवजी कच्चे तेल आयात करून शुद्धीकरण प्रणालीद्वारे पुरवठा केला जातो. याचाच अर्थ भारत रशियन पेट्रोल पुरवठ्यावर थेट अवलंबून नाही. त्यामुळे रशियाने नुकत्याच टाकलेल्या बंदीचा भारतावर तात्काळ परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे.

पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढणार का?

भारत हा जगातील प्रमुख तेल शुद्धीकरण केंद्रापैकी एक आहे. भारत अनेक देशांना पेट्रोल, डिझेल आणि पीएनजीचा पुरवठा करतो. भारत दररोज ५६ लाख बॅरलचे शुद्धीकरण करतो. भारत फक्त देशांतर्गत तेलाचीच मागणीच पूर्ण करत नाही, तर शुद्ध केलेल्या इंधनाची निर्यातही करतो. पण रशियाच्या निर्णायाचा भारताला अप्रत्यक्ष धोका होऊ शकतो. जागतिक पुरवठ्यातील व्यत्यय बाजारात चणचण निर्माण करू शकतो. त्यामुळे रशियाच्या या निर्णायामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढू शकतात. सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किंमती ११० डॉलर प्रति बॅरेलवर पोहचल्या आहेत. या वाढत्या किंमतीमुळे भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या आधीच दबावाखाली आहेत. यावर भारत सरकारने एक्साइज ड्युटी कमी करून तोडगा काढलाय. पण रशियाच्या निर्यात बंदीचा भारताला थेट फटका बसणार नाही. पण कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paithani Saree Contrast Blouse: लग्नसराईत पैठणी साडीवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी आणि स्वस्त लेटेस्ट डिझाईन्स ब्लाऊज

Maharashtra Live News Update: - भंडाऱ्यातील साकोलीत असलेल्या बांबूच्या झाडांना भीषण आग

Water consumption: जेवणानंतर पाणी पीत नसाल तर शरीरात काय बदल होतात?

अबब! लग्न समारंभात वधूवर ८ कोटी रुपयांची रोकड उधळली? व्हायरल व्हिडिओमागील सत्य काय?

आठव्या वेतन आयोगावर सर्वात मोठी अपडेट, कधी लागू होणार? किती पगार वाढणार? सगळी माहिती समोर

SCROLL FOR NEXT