Rules Change In April 2024  Saam Tv
बिझनेस

Rules Change In April 2024 : LPG सिलिंडरपासून टॅक्सपर्यंत आजपासून बदलणार हे ५ नियम, तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?

What Will Change From 1st April : नवीन वर्ष हे आर्थिक महिन्यापासून सुरु होते. एप्रिल महिना हा आर्थिक महिना म्हणून ओळखला जातो. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक गोष्टी बदल्या जाणार आहेत.

कोमल दामुद्रे

Financial Rules :

नवीन वर्ष हे आर्थिक महिन्यापासून सुरु होते. एप्रिल महिना हा आर्थिक महिना म्हणून ओळखला जातो. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक गोष्टी बदल्या जाणार आहेत.

एप्रिल महिन्यात पैशांच्या बाबतीत अनेक नियम बदलणार आहे ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. जाणून घेऊया आजपासून कोणत्या नियमांमध्ये (Rules) बदल झाले आहेत त्याविषयी

1. पीएफ खाते

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने एप्रिल २०२४ पासून पीएफ खाते आपोआप ट्रान्सफर केले जाणार आहे. यासाठी एम्प्लॉइजला कंपनीमध्ये फक्त पीएनआर नंबर सबमिट करावा लागणार आहे.

2. टॅक्स

जर तुम्ही ३१ मार्च पर्यंत टॅक्स फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला नवीन टॅक्स (Tax) प्रणाली ही १ एप्रिल २०२४ पासून डिफॉल्ट मानली जाईल. ज्या करदात्यांनी जुनी कर प्रणाली निवडली नाही ते आता नवीन टॅक्स नियमानुसार आटीआर फॉर्म भरावा लागणार आहे.

3. फास्टॅग केवायसी

ज्या फास्टॅग वापरकर्त्यांनी अद्याप फास्टॅग केवायसी केलेले नाही. त्यांना आजपासून फास्टॅगवरुन टोल भरता येणार नाही. NHAI ने Fastag KYC अनिर्वाय केले होते. फास्टॅग केवायसीची शेवटची तारीख ही ३१ मार्च करण्यात आली होती.

4. NPS खाते लॉग-इन प्रक्रिया

आजपासून NPS खाते लॉग-इन प्रक्रिया ही वेगळी असणार आहे. PFRDA ने लॉगिनसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. यासाठी वापरकर्त्याला आयडी, पासवर्डसोबत आधारशी लिंक असणारा मोबाइल क्रमांक समाविष्ट करावा लागेल.

5. एलपीजी सिलिंडर

तेल कंपन्यांनी आज एलपीजी सिलिंडरच्या किमती अपडेट केल्या आहेत. निवडणुकांपूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ३२ रुपयांनी कपात केली आहे. परंतु, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT