Rule Change Saam Tv
बिझनेस

Rule Change: LPG गॅस ते EPFO; १ जूनपासून या ६ नियमांमध्ये होणार बदल; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम

Rule Change From 1st June 2025: १ जूनपासून पीएफपासून ते बँकेच्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. पीएफ ते बँकेच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत.

Siddhi Hande

१ जूनपासून पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. या नियमांमुळे तुमच्या खिशांवर थेट परिणाम होणार आहे. यामध्ये एलपीजी गॅसच्या किंमतीपासून ते क्रेडिट कार्डपर्यंतचे अनेक नियम बदलणार आहे. यामध्ये बँकेच्याही काही नियमांचा समावेश आहे. या नियमांमध्ये बदल झाल्यावर त्याचा थेट परिणाम तुमच्या महिन्याच्या बजेटवर होणार आहे.

१. पीएफ अकाउंटचे नियम (PF Account Rule)

पीएफ अकाउंटच्या नियमांमध्ये १ जूनपासून बदल झाले आहेत. १ जूनपासून ईपीएफओ ३.० सुरु होईल. यानंतर तुम्ही एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकणार आहात.

२. क्रेडिट कार्ड (Credit Card Rule)

क्रेडिट कार्डच्याही नियमांमध्ये बदल होणार आहेत. ऑटो डेबिट फेल झाल्यावर त्यावर लागणारा २ टक्के दंड कमी होऊ शकतो. याबाबत नियम बदलू शकतो. इंधन आणि युटिलिटी बिल पेमेंटवर लागणाऱ्या शुल्काबाबतचेही नियम बदलू शकतात.

३. एटीएम (ATM Rule)

एटीएमच्याही नियमांमध्ये बदल होणार आहे. १ जूनपासून फ्रि लिमिटपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन करण्यावर फी वाढू शकते.

४. एलपीजी गॅस (LPG Gas )

दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती अपडेट होतात. त्यामुळे जून महिन्यातदेखील एलपीजी गॅसच्या किंमती बदलणार आहेत.

५. बँकचे नियम (Bank Rule)

जून महिन्यापासून बँकेच्या एफडीच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो. सध्या हे दर ६.५ ते ७.५ टक्के आहे. आरबीआयच्या नवीन पॉलिसीनुसार हे दर अपडेट होऊ शकतात.

६. पेट्रोल डिझेल (Petrol Diesel Rule)

जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पेट्रोल डिझेलच्या पेमेंटवरील चार्जमध्ये बदल होऊ शकतात. यामुळे क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करताना तुम्हाला कदाचित जास्त चार्ज किंवा कमी चार्जदेखील लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT