सप्टेंबर महिन्यात या नियमांत होणार बदल
एटीएम ते स्टेट बँकेच्या नियमांत बदल केले जाणार
सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
सप्टेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सप्टेंबर महिन्यात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. बँकेचे नियम, गुंतवणूकीच्या नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत. दरम्यान, सप्टेंबरमध्ये कोणते बदल होणार आहेत ते जाणून घ्या.
सप्टेंबरमध्ये या नियमांत बदल (Rule Changes In September)
१. आता चांदीवरदेखील हॉलमार्किंग अनिवार्य
आता फक्त सोन्यावर नव्हे तर चांदीवरदेखील हॉलमार्किंग करण्याचा नियम लावण्यात आला आहे. १ सप्टेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. आता तुम्ही चांदीची कोणतीही वस्तू खरेदी केली तर त्यावर हॉलमार्क असणे गरजेचे आहे. यामुळे ग्राहकांना शुद्धतेची गॅरंटी मिळणार आहे.
२. SBI क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल केले आहेत. दरम्यान, क्रेडिट कार्ड चार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जर कोणत्या ग्राहकांचे ऑटो डेबिट फेल झाले तर त्यावर २ टक्के शुल्क आकारले जाईल.
३. एलपीजी सिलेंडरच्या किंमती
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होतात. १ सप्टेंबर रोजीदेखील तेल कंपन्या एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर करतील. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील भावांवर अवलंबून असतात.
४. एटीएममधून कॅश काढणे महागणार
दरम्यान, आता एटीएममधून कॅश काढण्याच्या नियमांत बदल केले आहेत. यामध्ये जर तुम्ही लिमिटपेक्षा जास्त कॅश काढली तर तुम्हाला चार्ज द्यावे लागणार आहे.
५. फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर
सप्टेंबर महिन्यात एफडीवरील व्याजदरातदेखील बदल केले जाणार आहे. सध्या बँका ६.५ टक्के ते ७.५ टक्के व्याजदर देतात. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.