Royal Enfield Reown Program Saam Tv
बिझनेस

कमी खर्चात होणार 'बुलेट' घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! Royal Enfield आता करणार सेकंड हँड बाईकची विक्री, जाणून घ्या प्रोसेस

Royal Enfield Second Hand Bike: रॉयल एन्फिल्ड कंपनीने नवीन Reown प्रोग्राम लाँच केला आहे. यात तुम्ही कमी किमतीत सेकंड हँड बाईक खरेदी आणि विक्री करु शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Royal Enfield Reown Program Second Hand Bike Buying And Selling :

दुचाकीच्या जगात रॉयल एन्फिल्ड ही कंपनी खूप जास्त नावाजलेली आहे. अनेक लोकांसाठी रॉयल एन्फिल्ड कंपनीच्या बाईक घेणे हे स्वप्न असते. कंपनीच्या बाईक नावाप्रमाणेच रॉयल राईड देतात असे म्हटले जाते. या बाईक अॅडव्हेंचर करण्यासाठी उत्तम असल्याचे म्हटले जाते. या बाईक जेवढ्या चांगल्या असतात तेवढ्याच महाग असतात. त्यामुळे सर्वांना या बाईक घेणे परवडत नाही.

रॉयल एन्फिल्ड बाईकच्या किंमतीत हळहळू वाढ झाली. कंपनीची सर्वात स्वस्त बाईक हंटर ३५० ची किंमतदेखील १.५० लाख रुपये आहे. त्यामुळे सर्व लोकांना घेणे शक्य होत नाही. त्यामुळेच कंपनीने रॉयल एन्फिल्ड बाईक घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींसाठी एक खास ऑफर आणली आहे. कंपनीने आता सेकंड हँड बाईक विकण्यास सुरुवात केली आहे. (Royal Enfield Reown Program)

रॉयल एन्फिल्ड कंपनीने Reown हा प्रोग्राम सुरु केला आहे. याअंतर्गत जुन्या बाईक्सची खरेदी विक्री केली जाईल. रॉयल एन्फिल्डने जुन्या बाईकची विक्री करण्यासाठी एक वेबसाइटदेखील सुरू केली आहे. जिथे तुम्ही बाईक खरेदी करु शकता आणि जुन्या बाईक्सची विक्री करु शकतात. यामुळे ग्राहकांना रॉयल एन्फिल्ड बाईक कमी खर्चात खरेदी करता येणार आहे. यात बाईकची योग्य किंमत, कागदपत्रे आणि वॉरंटी या सर्व गोष्टी अचूक मिळतील. (Royal Enfield Second Hand Bike)

बाईक कशी खरेदी करावी

जर तुम्हालाही रॉयल एन्फिल्ड बाईक खरेदी करायची असेल तर तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या आवडीची बाइक निवडू शकता. यानंतर ग्राहकांना बाईकचे ठिकाण, प्रकार, मॉडेल आणि वर्ष निवडण्याची सुविधा मिळेल. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी असलेल्या बाइक्सची माहिती ग्राहकांना मिळेल.

वेबसाइटवर बाइक खरेदी केलेले वर्ष, बाईक किती किलोमीटर चालवली आहे, ती बाईक कोणी कोणाला विकली आहे याबद्दल सर्व माहिती मिळेल. या वेबसाइटवरुन तुम्ही बाईकची टेस्ट राइट बुक करु शकता. तसेच बाईक तुम्ही EMI वर खरेदी करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT