Royal Enfield 743cc Price, 5 Riding Modes, and Full Specifications saam tv
बिझनेस

Royal Enfield : रॉयल एनफिल्डचं नवीन मॉडेल! 743 सीसी इंजिन, ५ रायडिंग मोड्स, काय आहे किंमत?

Royal Enfield 743cc Bike India Launch : रॉयल एनफिल्डच्या नवीन 'हिमालयन 750' ने दमदार 743cc इंजिन आणि आधुनिक फीचर्ससह भारतीय बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे.

Saam TV News

दुचाकीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. रॉयल एनफिल्डने आपली बहुप्रतीक्षित हिमालयन 750 ही अ‍ॅडव्हेंचर मोटारसायकल भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे. दमदार 743 सीसी ट्विन-सिलिंडर इंजिन, पाच रायडिंग मोड्स, क्रूझ कंट्रोल आणि गुगल मॅप्स नेव्हिगेशन यांसारख्या आधुनिक सुविधांनी ही बाइक सज्ज आहे. लांब पल्ल्याचा प्रवास आणि खडतर रस्त्यांवर रायडिंग करण्याची आवड असणाऱ्यांसाठी ही बाईक विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.

743 सीसीचे दमदार इंजिन

हिमालयन 750 मध्ये 743 सीसीचे एअर-ऑईल कूल्ड, ट्विन-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7,000 आरपीएमवर 55 पीएसची कमाल शक्ती, तर 5,000 आरपीएमवर 63 एनएम टॉर्क निर्माण करते. विशेष म्हणजे, 3,500 आरपीएमपासूनच कमाल टॉर्कच्या 90 टक्के टॉर्कची उपलब्धता होते. त्यामुळे चढ-उताराचे रस्ते आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात बाइकला चांगली कामगिरी करता येणार आहे. इंजिनला सहा-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर क्लचची जोड देण्यात आली आहे.

5 रायडिंग मोड्स आणि आधुनिक फीचर्स

या बाइकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पाच रायडिंग मोड्स. यामध्ये रोड, रोड स्पोर्ट, रेन, ट्रेल आणि कस्टम या मोड्सचा समावेश आहे. रस्त्यांची स्थिती आणि हवामानानुसार रायडरला मोड निवडता येणार आहे. याशिवाय क्रूझ कंट्रोलची सुविधा देण्यात आली आहे.

तसेच, बाइकमध्ये 4 इंचांची गोलाकार टीएफटी स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये गुगल मॅप्सच्या माध्यमातून नेव्हिगेशनची सुविधा मिळते. तसेच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम TPMS, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि इतर आवश्यक माहितीही स्क्रीनवर पाहता येणार आहे.

सुरक्षेसाठी खास व्यवस्था

सुरक्षेच्या दृष्टीने या बाईकमध्ये ड्युअल चॅनेल एबीएस, कॉर्नरिंग एबीएस आणि लीन सेन्सिटिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आले आहे. पुढील बाजूस 43 मिमीचे शोवा यूएसडी फोर्क्स, तर मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. पुढील सस्पेन्शनचा प्रवास 190 मिमी, तर मागील बाजूस 175 मिमी आहे.

वजन आणि इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये

हिमालयन 750 चे वजन 224 किलो असून, यात 17.8 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. सीटची उंची 815 मिमी, तर ग्राउंड क्लिअरन्स 205 मिमी आहे. पुढील बाजूस 19 इंचांचे, तर मागील बाजूस 17 इंचांचे चाक देण्यात आले आहे. दमदार इंजिन, आधुनिक तंत्रज्ञान, रायडिंग मोड्स आणि आरामदायी प्रवासासाठी आवश्यक सुविधांमुळे रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 अ‍ॅडव्हेंचर बाइकच्या बाजारपेठेत नवे आव्हान निर्माण करू शकते.

बुकिंग कधीपासून सुरू होणार?

या मोटारसायकलीच्या देशभरातील बुकिंगला १ डिसेंबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच अधिकृत डीलरशिपवर बुकिंग करता येणार आहे.

काय आहे किंमत?

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.89 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. वायकिंग ब्राँझ आणि सायबेरिया व्हाइट या रंगांतील स्पोक व्हील प्रकाराची किंमत 5.14 लाख रुपये आहे. तर टूरिंग अ‍ॅक्सेसरीजसह येणाऱ्या फ्लॅगशिप अंटार्क्टिक सिल्व्हर प्रकाराची किंमत 6.29 लाख रुपये आहे. कंपनीने ही बाईक विविध प्रकार आणि रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thigh size: जाड मांड्या असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका कमी? संशोधनातून धक्कादायक बाब समोर

Maharashtra News Live Update : अध्यक्ष योगेश सोमण यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर

Gold Rate Today : सोनं अचानक इतकं कसं महागलं? सुवर्णनगरीत दरांची मोठी झेप; चांदीचीही जोरदार मुसंडी

Sleeping With Socks : पाय थंड पडतात म्हणून मोजे घालता? आरोग्यावर होतो मोठा परिणाम, वाचा...

Delimitation Bill Row: शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसणारा, त्यांना सत्तेशिवाय... - विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT