दोन बाईक्स, दोन वेगवेगळे विचार. रॉयल एनफील्ड हंटर ३५० आणि टीव्हीएस रोनिन या दोन्ही बाईक्स भारतीय बाजारात एकाच किमतीच्या स्पर्धा करत असल्या तरी त्या वेगवेगळ्या प्रकारच्या रायडर्सना आकर्षित करतात. बाईकप्रेमींसाठी हा निवडीचा क्षण आहे. दमदार टॉर्कसह चालणारी हंटर घ्यायची की आधुनिक फीचर्ससह सजलेली रोनिन?
रॉयल एनफील्ड हंटर ३५० च्या रेट्रो व्हेरिएंटची किंमत ₹१.३७ लाखांपासून सुरू होते. टॉप व्हेरिएंटसाठी ती ₹१.६७ लाखांपर्यंत जाते. ही बाईक शहरातील राइडसाठी अधिक अनुकूल, कॉम्पॅक्ट आणि सहज नियंत्रित होणारी आहे. हंटरमध्ये कंपनीचे प्रसिद्ध जे-सिरीज ३४९ सीसी इंजिन दिले गेले आहे. जे २०.२ बीएचपी आणि २७ एनएम टॉर्क निर्माण करते.
हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले गेले आहे. हंटरचे वजन सुमारे १८१ किलो इतके आहे. ज्यामुळे ती स्थिर आणि मजबूत वाटते. मात्र, तिची राइड उच्च गतीपेक्षा आरामदायक आणि टॉर्कवर केंद्रित आहे. विशेषत: शहरातील ट्रॅफिकमध्ये सहजपणे हाताळता येईल. याउलट, टीव्हीएस रोनिन ही आधुनिक सेगमेंटमध्ये वेगळा अवकाश निर्माण करणारी बाईक आहे. तिची किंमत ₹१.२५ लाखांपासून सुरू होऊन टॉप व्हेरिएंटसाठी ₹१.५९ लाखांपर्यंत जाते.
रोनिनमध्ये २२५.९ सीसीचे ऑइल-कूल्ड इंजिन बसवलेले आहे. जे २० बीएचपी आणि १९.९३ एनएम टॉर्क निर्माण करते. कमी वजन (१५९ किलो) आणि तीक्ष्ण थ्रॉटल प्रतिसादामुळे ती नवीन रायडर्स आणि शहरात राइड करणाऱ्या बाईकप्रेमींसाठी अधिक सहज हाताळता येते. हंटर आणि रोनिन या दोन्ही बाईक्स सुमारे १२० किमी/तास वेग गाठू शकतात. मात्र त्यांच्या परफॉर्मन्सची अनुभूती पूर्णतः वेगवेगळी असते.

तसेच तिची अपसाइड-डाऊन फ्रंट फोर्क्स आणि मोनोशॉक रिअर सस्पेन्शन सेटअप हंटरच्या टेलिस्कोपिक फोर्क आणि ट्विन शॉकपेक्षा मस्त राइड देते. हंटर ३५० ही क्लासिक रूप आणि दमदार टॉर्क पसंत करणाऱ्यांसाठी योग्य आहे. तर टीव्हीएस रोनिन ही आधुनिक टेक्नॉलॉजी, हलके वजन आणि स्टायलिश राईड शोधणाऱ्या रायडर्ससाठी आकर्षक पर्याय ठरते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.