Royal Enfield Classic 350 Saam Tv
बिझनेस

आकर्षक लूक, दमदार इंजिन अन् नवीन स्टाईलसह Royal Enfield Classic 350 मार्केट करणार जाम! किती असेल किंमत?

Royal Enfield Classic 350 Price: रॉयल एन्फिल्डची सर्वाधिक विक्री होणारी Royal Enfield Classic 350 बाईक नवीन अपडेटसह लाँच झाली आहे. या बाईकची विक्री १ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

Siddhi Hande

देशातील सर्वात मोठी बाइक उत्पादक कंपनी म्हणजे रॉयल एन्फिल्ड. रॉयल एन्फिल्ड ही कंपनी आपल्या साहसी बाइक राइडसाठी ओळखली जाते. कंपनीच्या बाईक कोणत्याही रस्त्यावर अगदी उत्तम राइडचा अनुभव देतात, असं कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने आपल्या सर्वाधिक विक्री होणार Royal Enfield Classic 350 या बाइकमध्ये मोठे अपडेट दिले आहे. कंपनीचे आपली नवीन बाईक Royal Enfield Classic 350 सादर केली आहे.

Royal Enfield Classic 350 या बाइकमध्ये नवीन ग्रापिक्स, कलर ऑप्शन आणि अॅडव्हान्स फीचर्सचा समावेश आहे. कंपनी आपली ही बाईत १ सप्टेंबर २०२४ रोजी विक्रीसाठी लाँच करणार आहे. बाइकची किंमत १ सप्टेंबर रोजी जाहीर केली जाईल. लाँचवेळी बाईकचे अधिकृत बुकिंगही सुरु केले जाईल, असं सांगण्यात आले आहे.

Royal Enfield Classic 350 बाइक पाच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यात हेरिटेज प्रिमियम, सिग्न, डार्क आणि एमराल्ड यांचा समावेश आहे. या बाईकमध्ये ७ वेगवेगळे कलर ऑप्शन आहे.

रॉयल एन्फिल्डने या बाईकच्या इंजिन मेकॅनिझममध्ये कोणताही बदल केलेला नाही. या बाइकचा रेट्रो लूक तसाच आहे. यात मोठा मडगार्ड, इंधन टाकी देण्यात आली आहे. यामध्ये एलईडी लायटिंगचा समावेश आहे. हेडलाइट्ल, टेल लाइट्स, इंडिकेटर आणि पायलट लाइट्सवर दिसेल.

Royal Enfield Classic 350 च्या डार्क आणि एमराल्ड व्हेरियंटमध्ये अॅडजस्टेबल लीव्हरसह ट्रिपर पॉड आणि फिटमेंट म्हणून एलईडी विंकर्स मिळतात. बाईकच्या पुढील बाजूस ४१ मीमी टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागील बाजूल गॅस चार्ज्ड शॉक अॅब्झवर्हर सस्पेंस देण्यात आले आहे.

Royal Enfield Classic 350 ची किंमत अजून जाहीर झालेली नाही. मात्र, या कारची किंमत इतर बाइकपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या बाइकमध्ये अॅडव्हान्स फीचर्स आणि टेक्नॉलॉजी आहे. या बाईकची सध्याची किंमत १.९३ रुपये ते २.२ लाख रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT