Post Office Senior Citizen Saving Scheme, Atal Pension Yojana, Post Office Monthly Income Scheme Explained In Marathi Saam TV
बिझनेस

Senior Citizen Saving Scheme: सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला मिळणार पेन्शन; या योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक

Senior Citizen Saving Schemes Explained in Marathi: प्रत्येकाला आपले आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असते. त्यामुळे अनेकजण पैशांची बचत करतात. पैसे वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकाला आपले आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असते. त्यामुळे अनेकजण पैशांची बचत करतात. पैसे वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवतात. जर तुम्हालाही सेवानिवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल तर या योजना तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळेल. याच योजनांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजना (Senior Citizen Saving Scheme)

पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत खाते योजनेत तुम्हाला वार्षिक ८.२० टक्के व्याजदर मिळेल. या योजनेत तुम्ही किमान १००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवू शकतात. ही रक्कम तुम्हाला एकाचवेळी जमा करावी लागेल. ही रक्कम तुम्हाला पाच वर्षांच्या कालावधीत तुम्हाला मासिक उत्पन्नाच्या स्वरुपात मिळेल.

अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana)

अटल पेन्शन योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. या योजनेत तुम्हाला ६० वर्षांच्या वयानंतर १००० ते ५००० रुपये मासिक पेन्शन मिळेल. या योजनेत लाभ घेण्यासाठी १८ ते ४० वयोगटातील व्यक्ती अर्ज करु शकतात.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme)

पोस्ट ऑफिस मासिक पेन्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे. यात तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला पाच वर्षांसाठी मासिक पेन्शन मिळू शकते. यासाठी तुम्हाला एकत्र रक्कम गुंतवावी लागते. या योजनेत तुम्हाला वार्षिक ७.४ टक्के व्याजदर दिले जाते. त्यानुसार तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळतात. यात एका व्यक्तीसाठी तुम्ही जास्तीत जास्त ९ लाख रुपये तर जोडप्यासाठी १५ लाख रुपये गुंतवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murmura Chivda Recipe: घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिवडा, चवीला होईल सर्वात भारी

Maharashtra Live News Update: खेडमध्ये शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Nagar Panchayat Elections: भाजपचा 'बिनविरोध पॅटर्न' काय? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याआधीच गुलाल कसा उधळतो?

Jeera Rice Recipe: इंद्रायनी तांदळाचा जिरा राईस कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT