RBI Penalty To Bank Of Maharashtra Saam Tv
बिझनेस

RBI चा 'या' मोठ्या बँकेला जोर का झटका; तब्बल १.२७ कोटींचा दंड ठोठावला

RBI Penalty To Bank Of Maharashtra: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका मोठ्या बँकेला दंड ठोठावला आहे. निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी १.२७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन फायनान्स कंपन्या आणि एका बँकेवर कठोर कारवाई केली आहे. आरबीआने बँक ऑफ महाराष्ट्र बँकेला दंड ठोठावला आहे. बँकेने Know Your Customer म्हणजेच केवायसीच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. आरबीआयने तब्बल ११.२७ कोटी रुपयांचा दंड बँक ऑफ महाराष्ट्रला ठोठावला आहे. याशिवाय पूनवाला फिनकॉर्प आणि हिंदुजा लेलँड फायनान्स या कंपन्यांवरही कारवाई केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, बँक ऑफ महाराष्ट्रने केवायसीसह अनेक गाइडलाइन्सचे उल्लंघन केले आहे. आरबीआयने ८ ऑगस्ट २०२४ रोजी बँकेला दंड ठाठावला आहे. बँक कर्ज वितरणावरील क्रेडिट सिस्टीम, बँकांमध्ये सायबर सुरक्षा फ्रेमवर्क, केवायसी यावरील मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. बँक आणि ग्राहकांमध्ये व्यव्हारांमध्ये पारदर्शकता राहावी, यासाठी आरबीआयने काही गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. या गाइडलाइन्सचे पालन न केल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे.

याशिवाय, KYC मार्गदर्शक तत्वे, २०१६ च्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड कंपनीला ४.९० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच पुनावाला फिनकॉर्प लिमिटेडला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नियमांचे पालन न केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT