Fraud Case Report Saam Tv
बिझनेस

Fraud Case Report: तुमच्यासोबत फ्रॉड झालाय? तर Chakshu पोर्टलवरुन एका मिनिटात करा तक्रार; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

How To Report Fraud Case On Chakshu App: सध्या सर्वकाही ऑनलाइन होत आहे. सर्व गोष्टी डिजिटल होत असल्याने फ्रॉड होण्याचे प्रमाण झाले आहे. याच फ्रॉडला आळा घालण्यासाठी चक्षु अॅपवर जाऊन तक्रार करा.

Siddhi Hande

सध्या सर्वकाही डिजिटल झाले आहे.स्मार्टफोनमुळे सर्व गोष्टी अगदी चुटकीसरशी होतात. स्मार्टफोनचा वापर करुन अनेकदा फ्रॉड होतात. अनेकदा तुमच्या मोबाईलवर फोन करुन तुमची वैयक्तिक माहिती मिळवतात आणि त्याचा दुरुपयोग करतात. याचसोबत एसएमएसवर एखादी लिंक पाठवून त्यावरुन आपली वैयक्तिक माहिती मिळवतात. याच फ्रॉड कॉलला आळा घालण्यासाठी आता एक वेबसाइट लाँच करण्यात आली आहे. Chakshu वेबसाइटवर तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या फ्रॉडची माहिती देऊन त्या नंबरला कायमचं बंद करु शकतात. यामुळे तुमच्यासोबत होणारे फ्रॉड बंद होतीलच त्याचसोबत तो फ्रॉड करणारा व्यक्ती दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीलाच फोन करु शकणार नाही.

फ्रॉडला आळा घालण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम चक्षु या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला https://sancharsaarthi.gov.in/sfc/Home/sfc-complaint.jsp वर जा. त्यानंतर लिंकवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला ज्या माध्यमातून फसवणूक झाली आहे तो पर्याय निवडा. म्हणजे कॉल, मेसेज किंवा व्हॉट्सअॅप मेसेज निवडा.

यानंतर तुम्ही त्या नंबरचा स्क्रिनशॉट, फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करा.

यानंतर फसवणूक कधी झाली, कशी झाली याबाबत थोडक्यात माहिती लिहा. यानंतर तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती, मोबाईल नंबर लिहा.

यानंतर कॅप्चा कोड टाकून फॉर्म सबमिट करा. यानंतर तो फ्रॉड नंबर disable केला जाईल. यामुळे त्या नंबरवरुन परत कधीच कोणाला मेसेज किंवा कॉल जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : मटण, दारू पार्टीसाठी पैसे नव्हते; आखला खतरनाक प्लॅन, एका चुकीने मात्र सापडले पोलिसांच्या ताब्यात

England Playing XI : भारताविरोधात तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, 'धारदार' गोलंदाजाची एन्ट्री

Maharashtra Live News Update : महाडच्या बाजार पेठेत माकडांचा वावर

Dum Aloo: घरच्या घरी पाहुण्यांसाठी झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल दम आलू

Pune Crime : लग्नाच्या आणाभाका देऊन शारीरिक संबंध, प्रेग्नेंट राहिल्यावर रबडीमधून गर्भपाताची गोळी; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT