चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi 9 जुलै रोजी भारतात नवा Redmi 13 5G फोन लॉन्च करणार आहे. दरम्यान फोन लॉन्च करण्याआधीच या बजेट स्मार्टफोनची किंमत टिपस्टर अभिषेक यादवने X वर लीक केलीय. दरम्यान या डिव्हाइसमध्ये क्रिस्टल ग्लास डिझाइन आणि Snapdragon 4 Gen 2 Accelerated Edition प्रोसेसर असेल. लीक झालेल्या किंमतीसोबतच जाणून घेऊया या डिव्हाईसमध्ये काय खास असेल ते पाहूया.
Redmi 13 5G ची किंमत किती असेल
९ जुलै रोजी लॉन्च करण्यात येणारा हँडसेट दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. 6GB + 128GB आणि 8GB + 128GBया दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये हा फोन लॉन्च केलं जाणार आहे. ज्यामध्ये बेस मॉडेलची किंमत 13,999 रुपयांपासून सुरू होऊ शकते, तर 8GB रॅम असलेल्या व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये असू शकते.
डिव्हाइसवर 1,000 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळू शकतो. या मोबाईलच्या किमती कोणत्याच ऑफर शिवाय असणार असल्याचं टिपस्टरने म्हटलंय. दुसरीकडे, Xiaomi ने Redmi 13 5G च्या किंमतीबाबत कोणताच खुलासा केलेला नाहीये. त्यामुळे लॉन्चच्या वेळी हे तपशील बदलू शकतात.
काय असतील फीचर्स
स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.79-इंच LCD FHD+ स्क्रीन असेल. डिव्हाइस Snapdragon 4 Gen 2 AE वर चालणार आहे आणि त्याला HyperOS मिळेल. या फोनमध्ये 33W चार्जिंगसह 5,030mAh बॅटरी दिली जाणार आहे. तर या हँडसेटमध्ये मागील बाजूस LED फ्लॅशसह 108MP प्राथमिक कॅमेरा देण्यात येणार आहे.
सुरक्षित प्रमाणिकरणासाठी हा फोन साइड-माउंट फिंगरप्रिंट रीडरसह येतो. हा फोन काळ्या, गुलाबी आणि निळ्या रंगात येणार असल्याचे सांगितले जातंय. चार्जिंगसाठी यात हेडफोन जॅक, आयआर ब्लास्टर आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.