चीनी टेक कंपनी Xiaomi ने भारतीय बाजारात आपले नवीन प्रीमियम फोन Xiaomi 14 आणि Xioami 14 Ultra लॉन्च केले आहेत. Samsung Galaxy S24 ला पर्याय म्हणून कंपनीने Xiaomi 14 स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. यात अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. याची किंमत देखील सॅमसंगच्या नवीन फ्लॅगशिपपेक्षा कमी आहे. याशिवाय Xiaomi 14 Pro हा हाय-एंड स्पेसिफिकेशन्ससह लॉन्च करण्यात आला आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
Xiaomi 14 हा Xiaomi 13 चा अपडेटेड व्हर्जन आहे. दोन्ही डिव्हाइस जवळजवळ सारख्याच डिझाइनसह येतात. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन फोनमध्ये 6.36 इंच पंच-होल AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट व्यतिरिक्त याची ब्राइटनेस 3000nits आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Xiaomi स्मार्टफोन्समध्ये पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आले आहे. यासोबतच यात LPDDR5x RAM, UFS 4.0 स्टोरेज आणि व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम उपलब्ध आहे. यात Android 14 वर आधारित HyperOS सॉफ्टवेअर आहे. मागील पॅनलमध्ये 50MP Light Fusion 900 कस्टमाइज्ड कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP टेलिफोटो कॅमेरा आहे. (Latest Marathi News)
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह स्टिरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत. IP68 रेटेड फोनमध्ये 4610mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड चार्जिंग व्यतिरिक्त 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
Xiaomi ने नवीन Xiaomi 14 ची 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये आहे. ICICI बँक कार्ड ऑफर आणि एक्सचेंज बोनससह हा फोन ग्राहक 59,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि जेड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. याची विक्री 11 मार्चपासून सुरू होणार आहे. कंपनीच्या वेबसाइट आणि स्टोअर्स व्यतिरिक्त हा फोन Amazon आणि Flipkart वरून खरेदी करता येईल.
या फोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेल्या अल्ट्रा मॉडेलची किंमत 99,099 रुपये ठेवण्यात आली आहे. याची विक्री 12 एप्रिलपासून सुरू होईल. ग्राहकांना 11 मार्च रोजी या फोनचे रिझर्व्ह एडिशन बुक करण्याचा पर्याय दिला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.