बिझनेस

Realme P1 Speed ​​5G चा आजपासून सेल; कमी बजेटमध्ये फोन घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

Realme P1 Speed ​​5G काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत आलाय. हा एक गेमिंगसाठी तयार करण्यात आलेला स्मार्टफोन आहे. जर तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज रात्रीपासून १२ वाजेपासून या गेमिंग स्मार्टफोनचा सेल सुरू होणार आहे.

Bharat Jadhav

Realme P1 Speed ​​5G काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत आलाय. हा एक गेमिंगसाठी तयार करण्यात आलेला स्मार्टफोन आहे. जर तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज रात्रीपासून १२ वाजेपासून या गेमिंग स्मार्टफोनचा सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये बंपर डिस्काउंटदेखील मिळणार आहे.

नुकताच Realme ने भारतीय स्मार्टफोन बाजारात Realme P1 Speed ​​5G लाँन्च केलाय. Realme ने हा स्मार्टफोन गेमर्सला लक्षात ठेवून डिझाइन केलाय. म्हणजेच जे लोक मोबाईलवर जास्त गेम खेळतात त्यांच्यासाठी हा फोन बनवण्यात आलाय. बरेच मोबाईल जास्त वेळ वापरला तर तो जास्त गरम होत असतो. ही बाब समजून घेत कंपनीने एक उच्च टेक्नोलॉजीचा वापर करत हा मोबाईल बनवण्यात आलाय.

जर तुम्ही 8GB रॅम आणि 128GB सह व्हेरिएंट घेत असाल तर त्याची किंमत 17,999 रुपये असेल. जर तुम्ही 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटचा फोन घेत असाल तर तुम्हाला 20,999 रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान पहिल्या सेल ऑफरमध्ये तुम्ही या मोबाइलचवर 2000 रुपयांपर्यंतच्या सूट मिळवू शकता. या मोबाईलची बेस व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे आणि 12GB मॉडेल 18,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. आज रात्री 12 वाजल्यापासून realme.com आणि ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर या मोबाईलचा सेल सुरू होणार आहे. Realme ने नव्या मोबाईलमध्ये अप्रतिम फीचर्सही दिले आहेत.

तुम्हाला 1080x2400 पिक्सेलच्या रिझोल्यूशनसह 6.67 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आलाय. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.यामुळे 2000 nits पर्यंत पीक ब्राइटनेस घेऊ शकता. Realme ने या फोनमध्ये डिस्प्ले रेनवॉटर स्मार्ट टच फीचर दिले आहे. Realme ने या स्मार्टफोनमध्ये परफॉर्मन्ससाठी Mediatek Dimensity 7300 Energy चिपसेट वापरण्यात आलाय. हा प्रोसेसर 4nm तंत्रज्ञानावर आधारित आहे.

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये मागील पॅनलमध्ये 50+2 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. स्मार्टफोनला उर्जा देण्यासाठी, यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT