बिझनेस

Realme 15T 5G Launched: 7000mAh बॅटरीसह कमी किमतीत दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत आणि ऑफर

Realme India: रिअलमी 15T भारतात दाखल झाला आहे. दमदार 7000mAh बॅटरी, IP69 रेटिंग आणि मीडियाटेक प्रोसेसरसह हा फोन 50MP फ्रंट व बॅक कॅमेऱ्यांनी सज्ज आहे.

Dhanshri Shintre

  • Realme 15T भारतात 20,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच.

  • 7000mAh बॅटरी व 60W फास्ट चार्जिंगची सुविधा.

  • MediaTek Dimensity 6400 Max 5G प्रोसेसरसह दमदार परफॉर्मन्स.

  • पहिला सेल 6 सप्टेंबरपासून सुरू होणार.

रिअलमीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Realme 15T लाँच केला आहे. हा हँडसेट Realme 15 मालिकेतील ताज्या मॉडेलपैकी एक असून दमदार बॅटरी, प्रगत कॅमेरा आणि शक्तिशाली प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे.

Realme 15T मध्ये 6.57 इंचाचा FHD+ डिस्प्ले असून त्याची पीक ब्राइटनेस क्षमता तब्बल 4000 Nits आहे. इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सरसह हा स्मार्टफोन अधिक सुरक्षित बनतो. यामध्ये MediaTek Dimensity 6400 Max 5G चिपसेट वापरण्यात आला आहे. फोन 8GB आणि 12GB LPDDR4X रॅमसह उपलब्ध आहे, तर स्टोरेजसाठी 128GB आणि 256GB पर्याय दिले गेले आहेत. स्टोरेज 2TB पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते.

Realme 15T 5G चा कॅमेरा सेटअप 

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास Realme 15T मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा f/1.8 अपर्चरसह तर दुसरा 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी यामध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme 15T ची बॅटरी आणि इतर वैशिष्ट्ये 

बॅटरीच्या बाबतीत हा फोन इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळा ठरतो. Realme 15T मध्ये 7000mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे, जी 60W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 15 वर आधारित Realme UI 6.0 वर चालतो. तसेच, हायब्रिड ड्युअल सिम सपोर्टसह येतो ज्यामध्ये सिम आणि मायक्रोएसडी कार्ड एकत्र वापरता येते

Realme 15T ची किंमत

Realme 15T च्या 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB + 256GB मॉडेलची किंमत 22,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. निवडक बँक कार्डवर 2000 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. फोनचा पहिला सेल 6 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे.

Realme 15T ची भारतातील सुरुवातीची किंमत किती आहे?

Realme 15T ची सुरुवातीची किंमत 20,999 रुपये आहे.

 Realme 15T मध्ये कोणता प्रोसेसर देण्यात आला आहे?

यात MediaTek Dimensity 6400 Max 5G चिपसेट दिला आहे.

Realme 15T ची बॅटरी क्षमता किती आहे?

या स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची दमदार बॅटरी असून 60W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.

Realme 15T चा पहिला सेल कधी होणार आहे?

या फोनचा पहिला सेल 6 सप्टेंबर रोजी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

Dhananjay Munde : पोलिसांना आडनाव लावता येत नसेल तर....; आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून समाजातील समतेवर प्रश्नचिन्ह

Shocking: स्पाय कॅमेरा अन् ७४ तरुणींचे प्रायव्हेट व्हिडीओ; विमानातील पायलटचं भयंकर कृत्य

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

SCROLL FOR NEXT