Honda XL750 Transalp Saam Tv
बिझनेस

Honda XL750 Transalp: फक्त 3 सेकंदात गाठते 100 किमीचा वेग; ही आहे होंडाची हाय पॉवर बाईक XL750, जाणून घ्या किंमत

Sports Bike : फक्त 3 सेकंदात गाठते 100 किमीचा वेग; ही आहे होंडाची हाय पॉवर बाईक XL750, जाणून घ्या किंमत

Satish Kengar

Honda XL750 Transalp :

भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये अॅडव्हेंचर बाईक्सची एक वेगळीच क्रेज आहे. Honda XL750 Transalp ही या सेगमेंटमधील एक उत्तम बाईक आहे. या बाईकमध्ये डॅशिंग लुकसह 755 cc चे पॉवरफुल इंजिन आहे.

ही बाईक 3.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास इतका वेग गाठते. बाईकमध्ये स्पोक व्हील आणि मस्क्युलर फ्रंट लूक आहे. ही बाईक 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खडबडीत रस्त्यांवरही धावणार आरामात

ही बाईक 90 bhp चा पॉवर देते. ही बाईक रस्त्यावर 23 kmpl चा मायलेज देते. या बाईकचे एकूण वजन 208 किलो आहे. होंडाच्या या बाईकचा टॉप स्पीड 180 किमी प्रतितास आहे. Honda XL750 Transalp ही एक लॉन्ग ट्रॅव्हलिंग बाईक आहे, त्यात 16.9 लीटरची मोठी इंधन टाकी आहे. बाईकमध्ये लिक्विड कूल्ड इंजिन आहे, जे लवकर गरम होत नाही. होंडाने या बाईकमध्ये सीटची उंची 850 मिमी दिली आहे, ज्यामुळे खराब रस्त्यांवर ही बाईकसह धावते. (Latest Marathi News)

एक प्रकार आणि दोन रंग पर्याय

Honda XL750 Transalp 11 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. ही बाईक सध्या एक प्रकारात आणि दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. बाईकला 75 Nm चा पीक टॉर्क मिळतो. सुरक्षेसाठी यात पुढील आणि मागील दोन्ही टायरवर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

या बाईकच्या पुढील बाजूस 21 इंच टायर आणि मागील बाजूस 18 इंच टायर आहेत. बाईकमध्ये TFT कलर डिस्प्ले उपलब्ध आहे. बाईकमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम उपलब्ध आहे. यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम आहे, जी अचानक वेगाने ब्रेक लागल्यास किंवा टायर घसरल्यास बाईक नियंत्रित करण्यास मदत करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयंकर घडलं, कंपनीतील ३ कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

SCROLL FOR NEXT