कार उत्पादनात मारुती आणि टोयोटा या कंपन्या अग्रेसर आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन कार लाँच करत असतात. मारुती आणि टोयोटा कंपनीच्या एसयूव्हीची मागणी खूप जास्त आहे. एसयूव्ही म्हटल्यावर कमी मायलेज असे सर्वांच्याच मनात येते. परंतु या कंपन्या नेहमी चांगले मायलेज देतात.
मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा हायरायडर या दोन कार खूप चांगले मायलेज देतात. या दोन्ही कार जवळपास सारख्याच आहेत. कारमध्ये मायलेजदेखील सारखेच आहे. या कार हायब्रिड व्हर्जनमध्ये 27.97kmpl मायलेज देतात.
पॉवरट्रेन
मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा हायरायडर या एसयूव्ही दोन इंजिन पर्यांयासह येतात. .5-लीटर पेट्रोल माइल्ड-हायब्रिड (103PS) आणि 1.5-लीटर पेट्रोल स्ट्रॉंग-हायब्रिड (116PS) या दोन पर्यायांत इंजिन असते. या कारमध्ये CNG पर्यायदेखील दिला जातो. यामध्ये ई-सीवीटी गियरबॉक्स दिला जातो. तर माइल्ड हायब्रिड इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो.
किंमत
टोयोटा हायरायडर या एसयूव्हीची किंमत १०.७३ लाख ते १९.७४ लाख रुपये आहे. तर मारुती ग्रँड विटारा या कारची किंमत १०.७० लाख ते १९.९९ लाख (एक्स शोरुमनुसार) आहे. या दोन्ही कारमध्ये 9-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, वेंटिलेटेड फ्रंट सीट, अॅम्बियंट लाइटिंग, स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, पॅडल शिफ्टर्स, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर, पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखी फिचर्स मिळतील.
या कारमध्ये ६ एअरबॅग्ज, एबीएस विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन (EBD), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (VSC), ऑल व्हील डिस्क ब्रेक आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी फिचर्स आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.