Menstrual Cycle: मासिक पाळीत तुमचीही फार चिडचिड होतेय? डोकं आणि मन शांत राहण्यासाठी हे उपाय करा

Menstrual Cycle: मासिक पाळीत शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे महिलांच्या मूडवर परिणाम होतो. मूड वारंवार बदलतो. त्यामुळे चिडचिड होते. या काळात तुम्ही नेहमी आनंदी राहायला हवे.
Menstrual Cycle
Menstrual CycleSaam Tv
Published On

Menstrual Cycle Mood Swings:

महिलांना मासिक पाळी येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असते. मासिक पाळीच्या काळात महिलांना खूप जास्त त्रास होतो. पोट दुखते. या काळात महिलांनी खूप काळजी घ्यायची असते. या काळात महिलांची खूप जास्त मूड स्विंग आणि चिडचिड होते.

मासिक पाळीत शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे महिलांच्या मूडवर परिणाम होतो. मुलींचा मूड वारंवार बदलतो. त्यामुळे चिडचिड होते. अशा वेळी मुलींना आवडतील त्या गोष्टी करायच्या असतात.

मासिक पाळीत राग आणि चिडचिड होण्याचे मुख्य कारण म्हणजे हार्मोन्समधील बदल. त्यामुळे त्यांना पोट, पाठदुखी अशा समस्या होतात. यामुळे राग येतो. तसेच वेदनेमुळे अनेकदा रात्री झोप लागत नाही. झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड होते.

मासिक पाळीत राग कमी करण्यासाठी आनंदी राहणे खूप महत्त्वाचे असते. या काळात मूड फ्रेश करण्यासाठी वेगवेगळ्या शारिरीक अॅक्टिव्हिटिज करायला हव्यात. बाहेरील मोकळ्या हवेत फिरायला हवे.

मासिक पाळीत चिडचिड कमी करण्यासाठी या गोष्टी करा

व्यायाम करा

व्यायाम केल्याने शरीरातील हार्मोन्स सुधारतात. त्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. दररोज व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते त्यामुळे जास्त त्रास होत नाही.

Menstrual Cycle
Vivah Anudan Yojana : मुलीच्या लग्नासाठी सरकारकडून मिळतायत पैसे; या योजनेचा घ्या लाभ

मोकळ्या हवेत फिरा

मासिक पाळीच्या काळात पूर्ण वेळ झोपून राहणे चांगले नसते. यामुळे तुम्हाला खूप कंटाळवाणे वाटते. त्यामुळे मूड खराब होतो. परिणामी चिडचिड होते. यामुळे जरा मोकळ्या हवेत फिरुन या. मित्रांसोबत वेळ घालवा. सकारात्मक विचार करा.

जंक फूड खाऊ नका

मासिक पाळीत पोट दुखत असते. या काळात तुम्ही जंक फूड खालल्यास खूप त्रास होतो. जंक फूड खालल्याने शरीरावर सूज येणे, वजन वाढणे अशा समस्या होतात. त्यामुळे या काळात जंक फूड खाऊ नका.

Menstrual Cycle
Name Astrology : या व्यक्तींना कधीच येत नाही प्रेमात अपयश, पैसाही राहातो खेळता; तुमचं नाव अक्षर यात आहे का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com