RBI Repo Rate Saam Tv
बिझनेस

RBI Repo Rate: सर्वसामान्यांना दिलासा! रेपो रेटमध्ये मोठी कपात, कर्जाचा हप्ता होणार कमी

RBI Repo Rate cut Governer Sanjay Malhotra Annoucement: आरबीआयने कर्जधारकांना दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. ०.२५ बेसिस पॉइंट्सने ही कपात झाली आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट केले कमी

रेपो रेटमध्ये कपात झाल्याने कर्जाचा हप्ता होणार कमी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. रेपो रेटमध्ये ०.२५ बेसिस पॉइंट्सने कपात झाली आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मलहोत्रा यांनी याबाबत आज घोषणा केली आहे. पतधोरण बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने आपोआप कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. त्यामुळे कर्जधारकांना दिलासा मिळणार आहे.

पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय (RBI Monetary Policy)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण बैठक तीन दिवसांपासून सुरु होती. आज या बैठकीचा शेवटचा दिवस होता. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे लोन स्वस्त होणार आहे. आता रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर आला आहे. याआधी रेपो रेट ५.५० टक्के होता. दर दोन महिन्यांनी पतधोरण बैठक घेतली जाते. यामध्ये रेपो रेट आणि इतर वित्तीय गोष्टींबाबत निर्णय घेतला जातो.

वर्षभरात १२५ बेसिस पॉइंट्सची कपात (Repo Rate Reduce by 0.25 basis points)

रिझर्व्ह बँकेने वर्षभरात रेपो रेटमध्ये १२५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात १०० बेसिस पॉइंट्सने कपात झाली होती. त्यानंतर आता दोनवेळा रेपो रेट स्थिर होता. आता पुन्हा यामध्ये कपात केली आहे. रेपो रेटमुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन स्वस्त होणार आहे.

रेपो रेट म्हणजे नक्की आहे तरी काय? (What is Repo Rate)

रेपो रेट हा रिझर्व्ह बँकेद्वारे ठरवला जातो. हा रेपो रेट सर्व बँकांना लागू होतो. यावर आधारित बँका आपल्या कर्जावरील व्याजदर ठरवतात. जर रेपो रेट घसरला तर व्याज कमी होणार आणि रेपो रेट वाढला तर व्याजदेखील वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curly Hair Care : तुमचे केस कुरळे आहेत? मग केसांवर 'या' गोष्टी कधीच लावू नका

Jio OTT Free: Jio युजर्ससाठी खुशखबर! फक्त 500 रुपयांत मिळणार 14 OTT प्लॅटफॉर्म मोफत

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसला 'या' सदस्याचं वागणं खटकलं; बाहेर जाण्यासाठी थेट दार उघडलं, पाहा VIDEO

Accident: फायर ब्रिगेडच्या वाहनाची दुचाकीला धडक, चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Kudi Designs: मराठमोळ्या कुड्यांच्या कानातल्यांचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, कोणत्याही साडीवर शोभून दिसतील

SCROLL FOR NEXT