RBI Repo Rate  Saam Tv
बिझनेस

RBI Repo Rate: दिवाळीआधी सर्वसामान्यांना खुशखबर मिळणार! होम, कार लोन पुन्हा स्वस्त होणार, SBI कडून मिळाले संकेत

RBI Repot Rate Cut: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण बैठक आजपासून सुरु झाली आहे. या बैठकीत रेपो रेटबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. रेपो रेट कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्वसामान्यांना दिलासा देणार

रेपो रेटमध्ये पुन्हा कपात करण्याची शक्यता

SBI रिसर्चमध्ये माहिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा खुशखबर देऊ शकते.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन स्वस्त होऊ शकते. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने रिसर्च रिपोर्ट जारी केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. रेपो रेटमध्ये २ बेसिस पॉइंट दर कपात हा आरबीआयसाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो.

दरम्यान, याबाबत अनेक तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की, १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पतधोरण बैठकीत रेपो रेट कायम ठेवण्याची शक्यता आहे.

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून तीन दिवस पतधोरण बैठक होणार आहे. यामध्ये धोरणात्मक दरांवर चर्चा होणार आहे. जागतिक बाजारातील तणाव, अमेरिकेने निर्यातीवर लावलेल्या ५० टक्के करावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत अंतिम निर्णय हा १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात

या वर्षी आरबीआयने सलग तीन वेळा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट या कालावधीत एकूण १०० बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. त्यानंतर यावेळी रेपो रेट कपात होणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. किरकोळ महागाईमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. ऑगस्टमध्ये रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. अमेरिकेतली कर आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत रिसर्च केले आहे. येत्या बैठकीत रेपो रेट २५ बेसिस पॉइंटने कपात होण्यासाठी वाव आहे. पुढील वर्षात किरकोळ महागाई स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरबीआय निर्णय घेऊ शकतो, असं सांगण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT