RBI imposes penalties on Maharashtra banks and tightens restrictions on Pusad Urban Bank over rule violations. Saam Tv
बिझनेस

महाराष्ट्रातील 2 बँकांवर RBI ची दंडात्मक कारवाई, पुसद अर्बन बँकेवरील निर्बंध वाढले

RBI Penalizes Banks in Maharashtra: आरबीआयने महाराष्ट्रातील दोन बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुंबईतील एका बँकेला दंड ठोठावला आहे. तर यवतमाळमधील एका बँकेवरील निर्बंध वाढवलेत.

Bharat Jadhav

  • आरबीआयने महाराष्ट्रातील दोन बँकांवर दंडात्मक कारवाई केली

  • पंढरपूर अर्बन बँक आणि मुंबईतील बँकेला दंड

  • पुसद अर्बन बँकेवरील निर्बंध आणखी कडक

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील दोन बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुंबईतील एका बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे. तर यवतमाळमधील पुसद अर्बन बँकेवरील निर्बंध वाढवलेत. आरबीआयने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

एनपीए खातेधाकांना कर्ज वितरीत

यात पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेला २ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला. मालमत्ता वर्गीकरण आणि नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स (NPA) संदर्भात नियमांचं पालन न केल्यामुळे ही कारवाई केली आहे. दरम्यान आरबीआय नियमांचं उल्लंघन तर कुठे होत नाही ना, याची पाहणी करत असते.

आरबीआयने ३१ मार्च २०२५ रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीची तपासणी केली होती. या तपासणीत बँकेनं आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचं दिसून आले. त्यानंतर बँकेला नोटीस बजावण्यात आली. बँकेनं दिलेलं उत्तर आणि झालेल्या सुनावणीत मांडलेली बाजू विचारात घेत आरबीआयकडून ही कारवाई केली गेली. दंड आकारण्यात आलेल्या बँकेने जुनी थकीत कर्ज जी एनपीए झाली आहे, त्यांना आणखी कर्ज दिलं होतं. नियमानुसार आधी थकीत कर्ज फेडलं पाहिजे, मग नवीन कर्ज दिले पाहिजे, असे असतानाही बँकेने कर्ज दिली होती, त्यामुळे कारवाई झाली.

मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँकेला दणका

मुंबईतील मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँकेला सुद्धा आरबीआयने दंड ठोठावला आहे. मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर २०,००० रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आलाय. नागरी सहकारी बँकांसाठी असलेल्या भांडवल पर्याप्तता संदर्भातील निर्देशांचे पालन न केल्यामुळे मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई करण्यात आली.

पुसद अर्बन बँकेच्या निर्बंधात वाढ

दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील दि पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेवर आरबीआयने निर्बंध घातले होते. त्याची पुन्हा मुदत वाढवण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ए अंतर्गत लावलेले हे निर्बंध आता ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहतील. बँकेच्या परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने आणि सार्वजनिक हिताचा विचार करून आरबीआयनं ही कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Fact Check: २५५० रुपये द्या अन् ५ लाख घ्या, PM मोदींच्या नावाने मिळतंय कर्ज? सरकारने दिली महत्वाची माहिती

देशाच्या राजकारणात खळबळ; राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देणार राजीनामा?

Ind vs Afg : भारताविरुद्ध वनडे, कसोटीसाठी टीम अफगाणिस्तान जाहीर; हुकमी एक्का संघाबाहेर

Shahi paneer Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही पनीर; पाहुण्यांनाही आवडेल खास रेसिपी

SCROLL FOR NEXT