ATM Saam Tv
बिझनेस

ATM Withdrawal Fee Hike: आता एटीएममधून पैसे काढणं महागणार! १ मेपासून RBI ची नवीन नियमावली लागू

RBI Increases Charges on ATM Services Across India: १ मे २०२५ पासून एटीएम व्यवहारांसंदर्भात नवे नियम लागू होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम वापराबाबतच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.

Bhagyashree Kamble

एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भात बदल केले जाणार आहेत. रिसर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम व्यवहारांवरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एटीएममधून व्यवहार करणं पूर्वीपेक्षा अधिक महाग होणार आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भात एंटरचेंज शुल्क १७ रूपयांवरून १९ रूपये करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मोफत असलेल्या मर्यादेनंतर अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. हा बदल १ मे २०२५ पासून लागू होणार असल्याची माहिती आहे.

अनेकांना व्यवहारांबाबतची मोफत मर्यादा किती असते, हे ठाऊक नसतं. त्यामुळे नकळत मर्यादा ओलांडतात आणि अनावश्यक शुल्क आकारले जातात. पैसे काढताना अधिकची रक्कम वजा होते. अशा प्रकारे अनभिज्ञेमुळे आपल्या खात्यातून कधी आणि किती रक्कम शुल्काच्या स्वरूपात जमा होतात हे कळूनही येत नाही.

आरबीआयचे नवे नियम काय आहेत?

आरबीआयच्या नव्या नियमानुसार, १ मे २०२५ पासून एटीएम व्यवहारांवरील शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या नव्या नियमानुसार आर्थिक रोख काढणे, बॅलन्स चेक, मिनी स्टेटमेंट, यात बदल करण्यात आले आहेत.

पूर्वी रोख काढल्यावर मोफत मर्यादा ओलांडल्यानंतर २१ रुपये शुल्क आकारले जात होते. परंतु, आता नव्या नियमानुसार प्रत्येक व्यवहारावर २३ रुपये आकारले जाणार आहे.

तसेच, बॅलन्स चेक किंवा मिनी स्टेटमेंट चेक करण्यासाठी आधी ६ रुपये शुल्क आकारले जात होते. पण आता वाढवून ७ रुपये आकारले जाणार आहे. यासह एटीएम इंटरचेंज फी १७ रुपयांवरून १९ रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT