बिझनेस

RBI: बँक ग्राहकांसाठी RBI चा मोठा निर्णय! आता काही तासांतच चेक क्लीअर; कामे पटापट होणार

RBI Decision On Check Clearence: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक क्लिअरन्स करण्याची प्रोसेस काही तासांतच पूर्ण करावी, असे निर्देश सेंट्रल बँकाना दिले आहेत.

Siddhi Hande

भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढावा बैठकीत अनेक निर्णय घेतले आहेत. आरबीआयने बँकांना आता चेक क्लीअर करण्याचा कालावधी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या चेक क्लिअर करण्यासाठी १ दोन दिवस लागतात. परंतु आरबीआयच्या निर्णयानुसार, आता हा वेळ काही तासांचा करण्यास सांगितले आहे. म्हणजेच आता तुमचा चेक काही तासांतच क्लीअर होणार आहे.

याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सेंट्रल बँकांना सूचना दिल्या आहेत.या निर्णयामुळे कोट्यवधी नागरिकाना होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनविषयक धोरण बैठकी काही तासांतच चेक सेटलमेंट करण्यास सांगितले आहे. चेक काही तासात स्कॅन, सबमिट आणि पास केला जाईल. त्यामुळे कामाची वेळ कमी होईल. याबाबत गाइडलाइन्स लवकरच जाहीर करण्यात येतील, असं आरबीआयने सांगितले आहे.

चेक क्लिअरन्सच्या प्रोसेसमध्ये सुधारणा आणि त्यातील जोखीम कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांचा चेक क्लिअरन्सचा अनुभव सुधारणे हा यामागचा उद्देश आहे.

नवीन प्रणालीमध्ये चेक क्लीअर करण्यासाठी स्कॅन करणे, सादर करणे हे काम काही तासामध्ये करण्यास अनुमती दिली जाईल. सध्याच्या चेक ट्रानझॅक्शन सिस्टिममध्ये (CTS)दोन दिवसांमध्ये चेक क्लिअरन्स केले जाते.परंतु ही प्रक्रिया आता लवकर लवकर होणार आहे. ऑन रियलायजेशन-सेटलमेंटसह चेक क्लिअरिंग प्रक्रियेची कार्यक्षमता आणि प्रोसेसमध्ये सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सेटलमेंट जोखीम कमी करण्यासाठी हा नियम डिझाइन करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT