RBI Saam Tv
बिझनेस

RBI चा मोठा निर्णय! RTGS आणि NEFT व्यवहार करणाऱ्यांचे पैसे चुकीच्या खात्यात जाणार नाहीत, लवकरच सेवा सुरू

RBI New Rule: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RTGS आणि NEFT व्यव्हार करणाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता रिझर्व्ह बँक नवीन सर्व्हिस सुरु करणार आहे. त्यामुळे चुकूनही चुकीच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RTGS आणि NEFT बाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला चुकीच्या ग्राहकांच्या खात्यात पैसे पाठवण्यापासून सुटका मिळणार आहे. तुम्हाला आता RTGS आणि NEFT वरुन पैसे ट्रान्सफर करताना लाभार्थ्याचे नाव पाहता येणार आहे. रिझर्व्ह बँक ही सुविधा सुरु करणार आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेत सर्व बँकांना निर्देश दिले आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या या नव्या सुविधेमुळे आता ग्राहकांना पैसे पाठवण्यापूर्वीच ज्या व्यक्तीला पैसे पाठवतो त्याचे नाव दिसणार आहे. त्यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. चुकीच्या खात्यात होणारे व्यव्हार कमी व्हावेत, हे यामागचे उद्दिष्ट आहे.

UPI द्वारे पैसे पाठवताना ग्राहकांना समोरच्या व्यक्तीचे नाव दिसते. परंतु आरटीजीएस किंवा एनईएफटीमध्ये ही सुविधा नव्हती. मात्र, आता ही सुविधादेखील उपलब्ध होणार आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने १ एप्रिल २०२५ पर्यंत ही प्रणाली लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला हे नवीन प्रणाली सुरु करण्याचे काम दिले आहे.यामुळे आता तुम्हाला कोणतेही पेमेंट करताना लाभार्थ्याचे नाव दिसणार आहे.

RTGS आणि NEFT द्वारे व्यव्हार करताना ग्राहकांना लाभार्थ्यांचा अकाउंट नंबर आणि आयएफएससी कोड टाकावा लागेल. त्यानंतर समोरच्या व्यक्तीचे नाव दिसेल. यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवत आहे त्याचेच नाव येते की नाही, याची खात्री करा त्यानंतर व्यव्हार करा.

RTGS आणि NEFT द्वारे व्यव्हार करणाऱ्या ग्राहकांना यामुळे फायदा होणार आहे.यामुळे फसवणुकीच्या संख्या कमी होणार आहे. यामुळे ग्राहक जास्तीत जास्त ऑनलाइन पद्धतीने व्यव्हार करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT