RBI Decision Saam Tv
बिझनेस

RBI Decision: RBI चं मोठं पाऊल! फाटलेल्या नोटांसंदर्भात घेतला मोठा निर्णय

RBI to Make Furniture From Torn Notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता फाटलेल्या नोटांपासून पार्शियल बोर्ड बनवणार आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जुन्या नोटांसंर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता फाटक्या नोटांचा वापर फर्निचर बनवण्यासाठी होणार आहे. फाटक्या नोटांना जाळण्याऐवजी किंवा फेकून देण्याऐवजी त्याचा काही चांगल्या कामांसाठी वापर केला जाणार आहे. यासाठी आरबीआय नवीन योजना आखत आहे. आरबीआयने वार्षिक अहवालात म्हटलंय की, या नोटांचा वापर पार्टिकल बोर्ड बनवण्यासाठी केला जाईल. ज्यापासून खुर्च्या, टेबल आणि इतर फर्निचर बनवू शकतात.

जुन्या नोटांचे काय होणार?

रिझर्व्ह बँकेला १५००० टनांहून अधिक चलनी नोटा मिळतात. या नोटा जुन्या, फाटलेल्या असतात. किंवा काही कारणांमुळे चलनातून बाद केल्या जातात. आतापर्यंत या नोटा जाळल्या जायच्या किंवा कुजून नष्ट केल्या जायच्या. ही प्रक्रिया पर्यावरणासाठी हानिकारक आहे.

आरबीआयने पार्टिकल बोर्ड बनवणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला आहे. या योजनेअंतर्गत रिझर्व्ह बँक खराब झालेल्या नोटांचे बारीक तुकडे करेल. त्यानंतर हे तुकडे कंपन्यांना विकले जातात. यामुळे कंपन्यांना स्वस्त आणि टिकाऊ मालदेखील मिळेल त्याचसोबत नोटांचा विनाश करण्याचा खर्चदेखील कमी होईल. या प्रक्रियेतून रिझर्व्ह बँकेला अतिरिक्त उत्पन्नदेखील मिळेल.

पर्यावरणाच्या हितासाठी आरबीआयने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.नोटा जाळल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत होते. त्यामुळे बँकेने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ वुड सायन्स ईणि टेक्नोलॉजी या विषयावर अभ्यास केला. त्यातून जुन्या नोटा या पार्टिकल निर्मितीसाठी वापरले जाऊ शकतात.

पार्टिकल बोर्ड म्हणजे काय?

पार्टिकल बोर्ड हे एक लाकूड आहे. जे लाकडाच्या शेव्हिंग्ज, भूसा, तंतूना गोंद किंवा रेझिनसह एकत्र बनवला जातो. यापासून तुमच्या घरातील फर्निचरदेखील बनवता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Royal Enfield Meteor 350: दमदार फिचर्स अन् जबरदस्त इंजिन, रॉयल एनफील्ड 'Meteor 350' चा नवा लूक, जाणून घ्या नवीन किंमत

Maharashtra Live News Update: भुसावळ तालुक्यातील हातनुर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले

CSMT Khau Galli : CSMT जवळच्या 'खाऊ गल्ली'ची जागा बदलणार, दुकानदारांना BMC च्या नोटिसा, कारण काय?

चमत्कारच! मृतदेह चितेवर ठेवला, अग्नी देण्यापूर्वीच महिलेनं केलं असं काही, सगळे हादरले!

Akola Crime : दगडाने ठेचून एकाची निर्घृण हत्या; मारेकरी मृतदेहाजवळ जाऊन झोपला, अकोला जिल्हा रुग्णालयातील घटना

SCROLL FOR NEXT