UPI Payment Saam Tv
बिझनेस

UPI Payment: वाह क्या बात है! बँक खात्यात पैसे नसतानाही करता येणार पेमेंट, आरबीआयनं सुरू केल्या दोन महत्त्वाच्या सुविधा

RBI Loan Facility: रिझर्व्ह बँकेनं 'यूपीआयच्या माध्यमातून बँकांमध्ये प्री-अप्रूव्ह्ड क्रेडिट सुविधा कार्यान्वित करण्यासंदर्भात परिपत्रक जारी करताना म्हटले आहे की, क्रेडिट सुविधेचा आता यूपीआयच्या कक्षेत समावेश केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

UPI Payment:

बऱ्याच वेळेस आपल्या खिश्यात पैसे नसले तर आपली आवडती वस्तू आपल्याला घेता येत नाही. पण रिझर्व्ह बँकेने(RBI) सुरू केलेल्या नव्या सुविधेमुळे तुमच्या बँक खात्यात पैसे नसतानाही तुम्ही खरेदी करू शकणार आहात. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) पैशाच्या व्यवहारासाठी बँकेकडून देण्यात येणारी प्री-अप्रुव्ड कर्ज (Loan) सुविधेला युपीआयमध्ये समाविष्ट करण्याची मंजुरी दिलीय.

दरम्यान याआधी जर खात्यात पैसे असले तरच युपीआय प्रणालीच्या मदतीने पेमेंट करता येत होतं. आता पैसे नसले तरीही पेमेंट करता येणार आहे. देशभरात पैशांची घेवाण-देवाण युपीआय प्रणालीद्वारे केले जाते. आतापर्यंत फक्त रक्कम करण्यासाठीच याचा वापर अधिक केला जात होता. परंतु आता युपीआयच्या माध्यमातून प्री-एप्रूव्ड कर्जाची सुविधा प्रदान करण्यात आलीय. ग्राहकांपर्यंत क्रेडिट पोहचावे यासाठी आरबीआयनं याची मंजुरी दिलीय. (Latest UPI News)

केंद्रीय बँकांनी एप्रिल महिन्यात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय)ची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याच्या माध्यामातून बँकांनी मंजूर केलेल्या कर्जाला स्थानांतर करण्याची मंजुरी दिल्याचं सांगण्यात आलं होतं. सध्या बचत खाते, ओव्हरड्राफ्ट खाते, प्रीपेड वॉलेट आणि क्रेडिट कार्डला युपीआयशी जोडण्यात येणार आहे.

बँकांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या कर्जांचं व्यवस्थापन युपीआयद्वारे करण्यात येणार असल्याचं रिझर्व्ह बँकेने सांगितलं. युपीआयच्या मर्यादेत कर्जाची सुविधा देखील समाविष्ट करण्यात आलीय या सुविधेनुसार ग्राहकाच्या मंजुरीने व्यावसायिक बँकेद्वारे कर्जाचे हफ्ते भरता येणार असल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलं.

आरबीयनुसार, ही सुविधा केल्यानं खर्च कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात उत्पादन वाढवण्यातही याची मदत होईल. मोबाईलच्या माध्यमातून २४ तासाच्या आत पैशांचे हस्तांतरणासाठी युपीआयचा वापर केला जातो. ऑगस्ट महिन्यात युपीआयद्वारे करण्यात आलेल्या व्यवहाराने १० अब्जाचा आकडा पार केला.तर जुलै महिन्यात युपीआयद्वारे करण्यात आलेल्या हस्तांतरणाचा आकडा हा ९.९६ अब्ज होता.

युपीआय पेमेंट करण्याचा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. यातून अनेक सुविधा ग्राहकांना मिळत असतात. आता युपीआयच्या माध्यमातून भारतात ७५ टक्के रिटेल डिजिटल पेमेंट केलं जातं. सध्या RuPay क्रेडिट कार्डला युपीआयशी लिंक करण्याची मंजुरी देण्यात आली होती. सध्या युपीआयच्या माध्यमातून बँकेत पैशांची देवाण-घेवाण करता येते. यात वॉलेट आणि प्री-पेड सुविधाही उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाचे 3 उमेदवार आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT