UPI Payment Without PIN: आता PIN शिवाय होणार PhonePe वर व्यवहार ! UPI Lite अँप लगेच डाऊनलोड करा

PhonePe UPI Lite Launched: PhonePe ने UPI Lite फीचर्स आपल्या अॅपवर लाइव्ह केले आहे.
PhonePe
PhonePeSaam Tv

PhonePe UPI Lite : PhonePe ने UPI Lite फीचर्स आपल्या अॅपवर लाइव्ह केले आहे. हे फीचर्स वापरकर्त्यांना त्यांच्या UPI Lite खात्यातून पिन न टाकता एका टॅपने रु. 200 पेक्षा कमी मूल्याचे पेमेंट करू देते.

पेटीएमनेही काही महिन्यांपूर्वी आपल्या अॅपवर (App) असेच फीचर सादर केले होते. खरं तर, ही सेवा नियमित UPI व्यवहारांपेक्षा अधिक अखंड आणि जलद व्यवहार करते, तसेच व्यवहार यशस्वी होण्याची शक्यता देखील वाढवते.

PhonePe
UPI Payment Update: UPI पेमेंटवर चार्जेस लागणार की नाही? एका मिनिटात सर्व शंका दूर करा, वाचा

प्रमुख बँकांचे सहकार्य मिळाले -

PhonePe वर UPI Lite ला सर्व प्रमुख बँका सपोर्ट करतात. हे देशभरातील (Nationwide) सर्व UPI व्यापारी आणि QR द्वारे स्वीकारले जाते. हे फीचर्स 'ऑन-डिव्‍हाइस' बॅलन्सद्वारे कार्य करते जे किराणा सामानासारख्या कमी किमतीच्‍या व्‍यवहारांसाठी अतिशय जलद रिअल-टाइम पेमेंट करण्‍याची अनुमती देते, अगदी व्यस्त वेळेच्‍या स्‍लॉटमध्‍येही.

UPI Lite कसे वापरावे?

वापरकर्ते हे फीचर्स (Features) त्यांच्या PhonePe अॅपवर एका सोप्या प्रक्रियेद्वारे त्वरित सक्रिय करू शकतात, ज्यामध्ये कोणत्याही KYC पडताळणीचा समावेश नाही. तुम्ही तुमचे UPI Lite खाते सहज तयार करू शकता. वापरकर्ते त्यांच्या Lite खात्यात ₹2000 पर्यंत लोड करू शकतात आणि एका वेळी कमाल ₹200 पर्यंत व्यवहार करू शकतात.

PhonePe
UPI Scam Alert : PhonePe, Google Pay वापरकर्त्यांनो सावधान! एक क्लिक अन् लाखोंचा गंडा...

PhonePe वापरकर्ते अॅपवर UPI Lite कसे सक्रिय करू शकतात?

  • फोनपे अॅप उघडा

  • अॅपच्या होम स्क्रीनवर, तुम्हाला UPI लाइट सक्षम करण्याचा पर्याय दिसेल.

  • UPI Lite मध्ये पैसे जोडण्यासाठी वापरलेले बँक खाते निवडा.

  • तुमचा पिन एंटर करा आणि तुमचे UPI Lite खाते सक्षम केले जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com