How to add name in ration card saamtv
बिझनेस

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

How to add name in ration card: रेशन कार्डमध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नाव जोडण्याबाबत माहिती जाणून घेऊ. कुठेही न जाता कुटुंबातील सदस्याचे नाव रेशन कार्डमध्ये जोडू शकता. ही प्रोसेस जाणून घेऊ.

Bharat Jadhav

घरातील सदस्याचं नाव रेशन कार्डमध्ये जोडायचे असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये. केंद्र सरकारने रेशन कार्डसाठी काही पात्रता निश्चित केलीय. ती पात्रता पूर्ण करणाऱ्यांच्या शिधापत्रिका बनवल्या जातात. परंतु बऱ्याच वेळा घरातील काही सदस्यांची नावे रेशन कार्डमध्ये समाविष्ट केली जात नाहीत. त्यामुळे ते नावे कार्डमध्ये जोडायचे असेल तर ते काम तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून रेशन कार्डमध्ये नाव जोडू शकता.

कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव जोडायचे असेल तर तुम्हाला मोबाईलवर एक नवीन अॅप घ्यावे लागेल. तुमच्या फोनच्या गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरमध्ये जाऊन 'रेशन कार्ड' किंवा 'मेरा रेशन 2.0' सर्च करावे लागेल. ते अॅप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावे लागेल. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला अ‍ॅप ओपन करावं लागेल. आधार कार्डच्या मदतीने लॉगिन करा. लॉगिनसाठी तुमच्या नंबरवर ओटीपी येईल.

हे तुम्हाला त्या प्रविष्ट करावे लागेल. त्यानंतर तुमच्या फोनमध्ये रेशन कार्डचे डिटेल्स दिसेल. त्यानंतर फॅमिली डिटेल्स मॅनेज करण्याच्या ऑप्शनवर जा. तेथे तुम्हाला अ‍ॅड न्यू मेंबर वर क्लिक करावे लागेल. तेथे मागितलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. यानंतर कुटुंबातील सदस्याचे नाव जोडले जाईल.

रेशन कार्डमध्ये कुटुंबातील सदस्याचे नाव जोडण्याचे काम ऑनलाइन किंवा ऑफलाइन देखील करता येईल. त्यासाठी जवळच्या अन्नपुरवठा केंद्रात जावे लागेल. तेथे अर्जसोबत कुटुंबातील सदस्याच्या आधार कार्डची प्रत सबमिट करावी लागेल. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पावती दिली जाईल. सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्या सदस्याचे नाव रेशनकार्डमध्ये जोडले जाईल.

दर ५ वर्षांनी रेशन कार्डसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक

केंद्र सरकारने रेशनकार्डबाबत एक नवीन नियम लागू केलाय. जर कार्डधारकाने हा नवीन नियम पाळला नाही तर त्यांचे कार्ड रद्द केले जाईल.आता रेशन कार्डसाठी ई-केवायसी करणे आवश्यक असणार आहे. डुप्लिकेट रेशनकार्ड आणि फसवणूक रोखणे आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत मोफत धान्य पोहोचावे यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Volvo: 'सुपर ३०' ! वॉल्वो कंपनीची नवीन शानदार, जबरदस्त EX 30 कार; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा; जाणून घ्या कुठे कसा असेल मेगाब्लॉक

Chhagan Bhujbal News : भुजबळांचा डाव, 10 टक्के आरक्षणावर घाव? मंत्र्यांचा भुजबळांचा मराठा नेत्यांना थेट सवाल

Maharashtra Politics : ठाण्याच्या सुभेदारीवरुन नाईक-शिंदे भिडले; शिंदे-भाजपसाठी ठाणे महत्वाचं का? वाचा

SCROLL FOR NEXT