Ration Card Rule Saam Tv
बिझनेस

Ration Card Rule: रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल! फक्त ४५० रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलेंडर

Ration Card New Rule: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्डवर आता गॅस सिलेंडर फक्त ४५० रुपयांना मिळणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने आतापर्यंत नागरिकांसाठी अनेक योजना राबवली आहे. यातील एक योजना म्हणजे रेशन कार्ड. रेशन कार्डवर नागरिकांना कमी खर्चात जीवनावश्यक वस्तू मिळतात. यामध्ये गहू,तांदूळ, तेल, रॉकेल या गोष्टींचा समावेश आहे.

ज्या नागरिकांना परिस्थिती गरीब आहे. त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. राज्य सरकार या रेशनच्या किंमती ठरवतात. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज्य सरकार रेशन कार्ड देतात.तसेच रेशनच्या किंमतीदेखील तेदेखील ठरवले जाते. (Ration Card Rule)

आता या राज्याच्या सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता नागरिकांना फक्त ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे. राजस्थान सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानमधील नागरिकांना या योजनेचा चांगला लाभ मिळणार आहे.

रेशन कार्डधारकांना कमीत कमी किंमतीत मिळणार सिलेंडर

रेशन कार्ड धारकांना नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्ट म्हणजे एनएफएसएअंतर्गत कमीत कमी किंमतीत गॅस सिलिंडर दिला जायचा. मात्र, आता रेशन कार्ड धारकांना फक्त ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहे. (Ration Card New Rule)

राजस्थान सरकारकडून सुरुवातील फक्त उज्जवला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर दिला जात होता. मात्र, आता रेशन कार्डधारकांनादेखील ४५० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर दिला जाणार आहे. यासाठी नागरिकांना रेशन कार्ड आणि एलपीजी आयडी लिंक करावा लागणार आहे.

राजस्थानमध्ये सध्या १,०७,३५,००० पेक्षा जास्त लोक नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्टच्या लिस्टमध्ये आहेत. त्यातील ३७ लाख परिवारांना बीपीएल आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ मिळतो. त्यामुळेच आता उरलेल्या ६८ लाख कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

रेशन कार्ड केवायसी करणे गरजेचे

सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे. रेशन कार्ड केवायसी केल्यानंतरच तुम्हाला कमी किंमतीत सिलेंडर मिळणार आहे. यासाठी तुम्हाला रेशन कार्ड आणि एलपीजी आयडी सीडिंग करावे लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes: डायबिटीज कंट्रोल होत नाहीये? या गोष्टीची कमी वाढवू शकतं टेन्शन

सरकारकडून लाडक्या बहिणींना दसरा-दिवाळीचं मोठं गिफ्ट; बँक खात्यात पाठवले 10 हजार रुपये|VIDEO

Friday Tips: शुक्रवारी हे पदार्थ खाण टाळा, अन्यथा...

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

SCROLL FOR NEXT