Ration Card Saam Tv
बिझनेस

Ration Card KYC: कामाची बातमी! रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत वाढली; शेवटची तारीख काय?

Ration Card KYC Deadline Increases: रेशन कार्ड केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, आता केवायसी करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेशन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्डवर तुम्हाला कमीत कमी दरात अन्नधान्य दिले जाते. गरीब कुटुंबातील नागरिकांना या योजनेमुळे खूप फायदा होतो. दरम्यान, आता सरकारने रेशन कार्ड केवायसी करणे अनिवार्य केले आहे. आता केवायसी करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख काय?

रेशन कार्ड केवायसी करणे सर्व नागरिकांसाठी गरजेचे आहे. आता तुम्ही ३१ जुलै २०२५ पर्यंत रेशन कार्ड केवायसी करु शकतात. त्यामुळे तुम्ही जर अजूनही रेशन कार्ड केवायसी केले नसेल तर तुमच्याकडे अजून १० दिवस आहेत.त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर केवायसी करा.

केवायसी केले नाही तर

जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. लाभार्थ्यांना रेशन मिळणार नाही. याचसोबत तुमचे रेशन कार्ड निष्क्रियदेखील केले जाऊ शकते. त्यामुळे स्वस्त दरात मिळणारे धान्य तुम्हाला मिळणार नाही.

केवायसी कुठे अन् कसं करावं?

तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड केवायसी करु शकतात. ऑनलाइन केवायसी करायचे असेल तर Mera e-KYC या अॅपवर जाऊ करावे लागेल. याचसोबत तुम्ही जवळच्या रेशन दुकानावर जाऊनदेखील केवायसी करु शकतात.

जर तुम्हाला आधारकार्ड आणि रेशन कार्ड लिंक करायचे असेल तर rcms.mahafood.gov.in या वेबसाइटवर जाऊन करा. याचसोबत तुम्हाला शिधावाटप कार्यालयात जाऊनदेखील आधार आणि रेशन कार्ड लिंक करु शकतात.

रेशन कार्ड ईकेवायसीसाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड आणि बायोमॅट्रिक करणे आवश्यक आहे.याचसोबत दर तुमचे आधार आणि रेशन कार्ड लिंक असेल तर तु्म्ही ऑनलाइन सोप्या पद्धतीने केवायसी करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT