Ration Card Saam Tv
बिझनेस

Ration Card: कामाची बातमी! या रेशन कार्डधारकांना मोफत धान्यासोबत मिळणार १००० रुपये; काय आहे नवी योजना?

Ration Card New Scheme: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्डधारकांना आता मोफत अन्नधान्यासोबत १००० रुपये मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card) महत्त्वाची बातमी आहे. रेशनकार्डधारकांना आता मोफत रेशनसोबतच महिन्याला १००० रुपयेदेखील मिळणार आहे. केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. या योजनेत मोफत धान्यासोबतच आर्थिक मदतदेखील मिळणार आहे.

ज्या नागरिकांनी आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे, त्या नागरिकांना हे पैसे मिळणार आहे. त्यामुळे खूप कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेचे उद्दिष्ट

गरीब कुटुंबातील नागरिकांना अन्नधान्यासोबतच आर्थिक मदत मिळावी, हे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. या अटींमध्ये बसणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना १००० रुपये मिळतात.

योजनेच्या अटी

मिडिया रिपोर्टनुसार, ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे याचसोबत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा कमी आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. रेशन कार्ड केवायसी असणे गरजेचे आहेत. या योजनेत लाभार्थ्यांना खाद्य सुरक्षादेखील दिली जाईल. याचसोबत अकाउंटमध्ये दर महिन्याला १००० रुपये पाठवले जातील. यमुळे योजनेत पारदर्शकता राहिल.

अर्ज कसा करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, उत्पन्नाचा दाखल आणि निवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तुम्हाला राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाइटवर भेट द्यायची आहे. त्यानंतर योजनेच्या अर्जावर क्लिक करा. रेशन कार्ड नंबर आणि इतर माहिती भरा. कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर फॉर्म सबमिट करा. याचसोबत केवायसी करणे अनिवार्य आहे. ही योजने १ जून २०२५ पासून सुरु होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

SCROLL FOR NEXT