Ration Card Google
बिझनेस

Ration Card: रेशन कार्ड न वापरल्यास होणार रद्द? काय आहे नियम? वाचा सविस्तर

Ration Card Non Usage Rules: जे लोक अनेक दिवस रेशन कार्डाचा कुठेच वापर करत नाहीत. त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते. चला तर जाणून घेऊ शिधा न घेतल्यास शिधापत्रिका किती दिवस रद्द होऊ शकते?

Saam Tv

देशातल्या गरीब वर्गाला कुटुंबाच्या संख्येप्रमाणे रेशन कार्डावर एकदम स्वस्त दरात धान्य मिळते. ही जबाबदारी राज्य सरकार पार पाडते. रेशन कार्डावरील यादी वेळोवेळी अपडेट करून लोकांना धान्य पुरवले जाते. त्याच दरम्यान काही खोट्या बाबी आठळल्यास तर लगेचच रेशन कार्ड रद्द केले जाते. तसेच तुम्ही रेशन कार्डाचा बराच काळ उपयोग केला नाही तर ते रद्द केले जाऊ शकते. पुढे आपण सविस्तर नियम व अटी जाणून घेणार आहोत.

रेशन कार्ड

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत शिधापत्रिका असणाऱ्या कुटुंबांना आवश्यक धान्य पुरविले जाते. यामध्ये ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असते त्यांनाच ही सुविधा असते. तसेच त्यांच्या कुटुंबाच्या संख्येनुसार त्यांना स्वस्त दरात धान्य पुरवले जाते. त्याच दरम्यान तुमच्या रेशन कार्डावर नोंद केली जाते. त्यात तुम्ही कोणत्या महिन्यात आला आहेत यांची नोंद केली जाते.

रेशन कार्डाचा महत्वाचा नियम

जे लोक सहा महिने सलग धान्याचा लाभ घेण्यासाठी जात नाहीत त्यांच्यासाठी रेशन कार्डाच्या सुविधा रद्द होतात. या तुमच्या चुकी त्यांच्या लक्षात येते की, तुम्ही आता स्वस्त अन्न खाण्यास पात्र नाही. तसेच तुम्हाला याची आवश्यकता नाही. अशा वेळेस सहा महिने रेशन न घेतल्यास त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाते.

रेशन कार्ड पुन्हा चालू करू शकतो का?

सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही सुविधा पुन्हा सुरू होऊ शकते का? तर त्यासाठी तुम्हाला AePDS च्या अधिकृत वेब साईटला भेट द्या. तिथे तुम्हाला करेक्शन पर्याय दिसेल त्यावर जा. आता रेशन कार्ड सुधारणा पृष्ठावर जा आणि आपला नंबर शोधण्यासाठी अर्ज भरा. तुम्हा संपुर्ण माहिती मिळेल. असे न झाल्यास ते रद्द झाले असेल ती पुन्हा दुरूस्त करा. सुधारणा केल्यानंतर स्थानिक PDS कार्यालयाला भेट द्या आणि पुनरावलोकन अर्ज सबमिट करा. आता तुमच्या अर्ज जर स्विकारण्यात आला तर तुमचे रेशन कार्ड पुन्हा सक्रीय केले जाईल.

Edited By: Sakshi Jadhav

Woman Health Care :प्रत्येक महिलेने हे ५ सूपरफूड खायलाच हवेत, वाचा काय काय फायदे होतील

कहां गायब हो गये ये लोग? जगदीप धनखड यांच्यानंतर आणखी एकजण बेपत्ता, ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक आरोप

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

Border 2: सनी देओलला मोठा झटका! 'बॉर्डर 2'ची रिलीजची तारीख अचानक बदलली, अभिनेता म्हणाला...

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

SCROLL FOR NEXT