Share Market  Saam Tv
बिझनेस

Share Market: राम मंदिर लोकार्पणानंतर हे ५ शेअर जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता; गुंतवणूकदारांची असणार नजर

Stocks Price Increased: अयोद्धेतील राम मंदिराचे २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे.मात्र राम मंदिर लोकार्पणानंतर अयोद्धा शहाराशी संबंधित असलेल्या किंवा तेथील काही कंपन्याचे शेअर्स वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ram Madir Inaugaration Ayodhya Related Company Stocks Price May Increase:

अयोद्धेतील राम मंदिराचे २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त शेअर बाजार सोमवारी बंद होता. मात्र राम मंदिर लोकार्पणानंतर अयोद्धा शहाराशी संबंधित असलेल्या किंवा तेथील काही कंपन्याचे शेअर्स वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांच्या नजरा या कंपन्यावर असल्याचे दिसत आहे. (Latest News)

अलाइड डिजिटल सर्विसेस

मागील काही महिन्यात अलॉयड डिजिटल सर्विसेसच्या शेअर्स ३५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे. ही एक ग्लोबल आयटी सर्विस मॅनेजमेंट कंपनी आहे. या कंपनीला अयोध्या स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. शहरातील सीसीटीव्ही देखरेखीच्या इंटीग्रेशनच्या कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट पाहायला मिळाला. सध्या या कंपनीचे मार्केट कॅप १००० कोटी रुपये आहे.

कामत हॉटेल्स

मागील एका वर्षात कामत हॉटेल्सचे शेअर्स ३३ टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीने अयोध्येमध्ये ५० रुम असलेले एक हॉटेल उघडणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय कंपनी अयोध्येमध्ये अजून दोन हॉटेल्स उघडणार असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीची मार्केट कॅप सध्या ८८४ कोटी रुपये आहे.

एसआयएस लिमिटेड

एसआईएस लिमिटेड ही एक सुरक्षा पुरवणारी कंपनी आहे. अयोद्धेत पार पडलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी या कंपनीवर सोपवण्यात आली होती. मंदिर परिसरात काम करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी मंदिर ट्रस्ट आणि कंपनीमध्ये करार करण्यात आला आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये १९ जानेवारीला ११ टक्क्यांनी वाढ झाली होती.

पक्का लिमिटेड

पक्का लिमिटेड ही अयोध्येमधील स्मॉलकॅप कंपनी आहे. कंपनीची मार्केट कॅप १५०० कोटी रुपये आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कंपोस्टेबल प्लेट्स, वाट्या, चमचे पुरवण्यात आले होते. जानेवारीमध्ये कंपनीचे शेअर्स ७० टक्क्यांनी वाढले आहेत.

ट्रॅव्हल स्टॉक्स

टॅव्हल स्टॉक्समध्ये इंडिगो, आयआरसीटीसी, ईजमायट्रिप, थॉमस कुक इंडिया अशा अनेक कंपनीची नावे आहेत. राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी ५ कोटी लोक अयोद्धेला जाऊ शकतात.या परिस्थितीत ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे या कंपन्याचे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे.

(Disclaimer- साम टीव्ही शेअर खरेदी किंवा विक्रीबाबत कोणताही सल्ला देत नाही. गुंतवणुकीआधी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.)

Edited By-Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avirat Patil: घे भरारी! इंजिनीअर झाला, पण पुण्याच्या FTII मध्ये गेला; जळगावच्या तरुणाच्या पहिल्याच लघुपटाला 'सुवर्ण कमळ'

म्हशीला झालं रानगव्यापासून रेडकू, दिसतंय सुद्धा रानगव्यासारखंच | VIDEO

Poha Chivada: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरीच बनवा चटपटीत अन् कुरकुरीत पोहा चिवडा, रेसिपी एकदा वाचाच

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

Maharashtra Politics : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पोसलेली कुत्री; कुणी केली जहरी टीका?

SCROLL FOR NEXT