PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

CM Kisan Yojana: शेतकऱ्यांना मिळणार ६००० रुपये, या राज्यात PM किसानच्या धर्तीवर CM किसान योजनेत महत्त्वाचा बदल

CM Kisan Yojana 6000 Rupees Installment: पीएम किसाननंतर राजस्थान सरकारने सीएम किसान योजना राबवली आहे. या योजनेत आता शेतकऱ्यांना ६००० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

राजस्थान सरकारची खास सीएम किसान योजना

शेतकऱ्यांना वर्षभरात मिळणार ६००० रुपये

निधी ३००० रुपयांवरुन ६००० होण्याची शक्यता

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना २००० रुपये दिले जातात. वर्षातून तीनवेळा हे पैसे दिले जातात. दरम्यान, आता याच पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारदेखील शेतकऱ्यांना खुशखबर देणार आहे. मुख्यमंत्री किसान सन्मान निधीअंतर्गत हप्ता ३००० रुपयांवरुन वाढवून ६००० करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा ४०००-४००० हजार रुपये मिळू शकतात.

पीएम किसान योजनेत वर्षाला ६००० रुपये दिले जातात.यानंतर राजस्थान सरकारच्या मुख्यमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत ३००० रुपये दिले जात होते. आता हा हप्ता ६००० करण्याच्या तयारीत आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिली अपडेट

मुख्यमंत्री भजन लाल यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना ९००० रुपये मिळत आहे. हे पैसे वाढवून १२,००० रुपये करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, हे पैसे कधी वाढवले जाणार आहेत याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.

सीएम किसान योजनेचे ४ हप्ते जारी

पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना आतापर्यंत ४ हप्ते देण्यात आले आहेत. यानंतर शेतकरी पाचव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांना १००० रुपये दिले जातात. वर्षभरात एकूण ३००० रुपये दिले दरम्यान,याआधीचा हप्ता १८ ऑक्टोबर रोजी देण्यात आला होता. त्यानंतर आता डिसेंबर म्हणजे याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge: 84 दिवसांचा वॅलिडीटीचा Jio चा सगळ्यात स्वस्त रिचार्ज

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अजामीनपात्र अटक वॉरंट

Bhosari Land Scam : भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी अडचणी वाढल्या, एकनाथ खडसेंना कोर्टाचा झटका

दुबईमध्ये ‘शुगर टॅक्स’ लागू होणार; कोणत्या पदार्थांवर लागणार शुगर टॅक्स? VIDEO

Skin care: थंडीमध्ये हाताचं कोपर काळं पडतंय? या सोप्या टीप्सने त्वचा होईल सॉफ्ट आणि उजळ

SCROLL FOR NEXT