RBI on Coins: १० रुपयांचे नाणं बंद होणार? नेमकं सत्य काय? RBI ने व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती

RBI on Coins Circulation Rumours: बाजारात असलेली अनेक नाणी ही चलनातून बाद झाली असल्याचा अनेकांना समज आहे. मात्र, आता रिझर्व्ह बँकेने यावर स्पष्टीकरण दिले आहे. सर्व नाणी ही वैध आहेत, असं रिझर्व्ह बँकेने सांगितलं आहे.
RBI on Coins
RBI on CoinsSaam Tv
Published On
Summary

१० रुपयाचं नाणं चलनातून बाद?

व्हायरल मेसेजवर रिझर्व्ह बँकेने दिलं स्पष्टीकरण

कोणत्याही प्रकारची नाणी बाद नाहीत

बाजारात एखादी गोष्ट खरेदी करायला गेल्यावर बरेचदा आपल्याकडे सुट्टे पैसे नसतात. यावेळी आपण ५,१०, २० रुपयांची नाणी देतो. दरम्यान, अनेकदा ही नाणी घेण्यास अनेक दुकानदार नकार देतात. ही नाणी बाजारात चालत नाही, अशी उत्तरे देतात. त्यामुळे खरंच ही नाणी बाजारात चालत नाही का, नाणी चलनातून बाद झाली तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडतो. दरम्यान, आता याबाबत रिझर्व्ह बँकेने माहिती दिली आहे.

RBI on Coins
RBI Repo Rate: EMIचा भार कमी होणार? कर्ज होतील स्वस्त! आरबीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

रिझर्व्ह बँकेने म्हटलंय की, ₹५० पैसे, ₹१, ₹२, ₹५, १०, आणि ₹२०ची नाणी अजूनही बाजारात वैध आहेत. ही नाणी बाजारात चालतात.

सध्या वेगवेगळ्या नाण्यांबाबत अफवा पसरत आहेत. १ रुपयांचे नाणे खोटे आहे, अनेकजण तर २ रुपयांचे नाणे घेण्यासदेखील नकार देतात. काही ठिकाणी १० रुपयांच्या नाण्यांवर वेगळी डिझाइन असल्याने हे नाणे खोटे तर नाही ना अशी शंका वर्तवली जाते. दरम्यान, आता रिझर्व्ह बँकेने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

वेगवेगळ्या डिझाइनची नाणी बाजारात उपलब्ध

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, एकाच रुपयांची वेगवेगळ्या डिझाइनची नाणी असणे सामान्य आहेत. वर्ष बदलल्यानंतर किंवा अनेक महत्त्वाच्या दिवसांच्या अनुषगांने नाण्यांवरील डिझाइन बदलण्यात आली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे एखाद्या डिझाइनचे नाणे असेल तर ते वैध आहे.

RBI on Coins
SIP Investment: १० वर्षांत ₹५० लाख कमवण्याचे स्वप्न होईल साकार! दरमहा किती SIP करावी लागेल? जाणून घ्या

दुकानदार नाणी घेण्यास नकार देऊ शकत नाही

दुकानदार अनेकदा नाणी घेण्यास नकार देतात. याचसोबत अनेक रुपयांची नाणी परत देतात. दरम्यान, दुकानदारांना नाणी वैध असताना परत करता येणार नाही.

रिझर्व्ह बँकेने सोशल मीडियावर दिला संदेश

रिझर्व्ह बँकेने नोटा आणि नाण्यांबाबतचा एक संदेश सोशल मीडियाद्वारे दिला आहे. नाणी बंद झाली आहेत, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

RBI on Coins
RBI Rule: तुमचं झिरो बॅलन्स अकाउंट आहे? RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय; हे ४ नियम लवकरच बदलणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com