Railways Rule Change Saam TV
बिझनेस

Railways Rule Change : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकीट बुकिंगसाठी नवा नियम लागू; वाचा सविस्तर

Railways Ticket Booking Rule Change : रिजर्वेशनसाठी लागणारा कालावधी कमी करण्यात आला आहे. ऐन दिवाळी सुरू असताना भारतीय रेल्वेने बदललेल्या नियमाची घोषणा केली आहे.

Ruchika Jadhav

या महिन्यात एक नोव्हेंबरपासून अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यात भारतीय रेल्वेमध्ये आजपासून विविध गोष्टींमध्ये बदल झाला आहे. रिजर्वेशनसाठी लागणारा कालावधी कमी करण्यात आला आहे. ऐन दिवाळी सुरू असताना भारतीय रेल्वेने बदललेल्या नियमाची घोषणा केली आहे. त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

किती दिवसांत करता येणार तिकीट बुक

तिकीट बुकिंग करताना म्हणजे रिजर्वेशन करताना किमान १२० दिवस आधी तिकीट बुक करावे लागत होते. मात्र आता तिकीट बुकिंगसाठी अवघे ६० दिवस लागणार आहेत. २ महिने आधीच अॅडवांस तिकीट बुक करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सहज एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे शक्य होणार आहे.

नियम लागू करण्याचं कारण

रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे की, १२० दिवसांच्या वेळात बऱ्याच ठिकाणी सीट कॅन्सल होत होत्या. यामध्ये सीट वेटींगला गेल्याने अनेक नागरिकांना प्रवास करता येत नाही. तसेच सीट कॅन्सल सुद्धा होतात. तसेच अनेकदा प्रवाशी आपलं तिकीट कॅन्सल करत नाहीत आणि प्रवास सुद्धा करत नाहीत. यामध्ये फसवणुकीने सीट मिळवण्याच्या घटना वाढल्यात. त्यात ज्या व्यक्तीला खरोखर गरज आहे त्यांना सीट मिळत नाहीत. त्यामुळेच भारतीय रेल्वेने कालावधी कमी केला आहे. आता फक्त ६० दिवस आधी सुद्धा तिकीट बुक करून तुम्ही तुमची सिट ठरवू शकता.

आधीच बुकिंग केल्यास आता काय होणार

काही व्यक्तींनी जर आधीच बुकिंग केली असेल तर त्यांच्या तिकीटाचे अता काय होणार? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. तर आधीच बुकिंग केलेल्या व्यक्तींच्या तिकीटात कोणताही बदल होणार नाहीये. रेल्वेचा हा नियम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. त्यामुळे येथून पुढे तिकीट काढल्यास त्या व्यक्तींना ६० दिवसांनी प्रवास करता येणारे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT