EPFO Rule Change: EPFO ने नियमांमध्ये केला बदल, आता PF खाते अपडेट करण्यासाठी फक्त 2 कागदपत्रेच आवश्यक, जाणून घ्या सविस्तर...

EPFO Rule Change Of Profile Update: ईपीएफओने पीएफ खात्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओ खातेधारकांना प्रोफाइल अपडेट करणे सोपे होणार आहे. त्यासाठी फक्त २-३ कागदपत्रांची आवश्यकता आहे.
EPFO Rule
EPFO Rule Saam Tv
Published On

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO)कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केले आहे. कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याबाबत नियम बदलले गेले आहे. हा बदल सर्व पीएफ खातेधारकांसाठी आहे.EPFO ने पीएफ खात्यातील माहिती सुधारण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन सर्व पीएफ खातेधारकांना करायचे आहे. EPFO ने जारी केलेले हे नवीन नियम कोणते याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

EPFO ने नाव, जन्मतारीख यासारखी वैयक्तिक माहिती दुरुस्त करण्यासाठी गाइडलाइन्स जारी केले आहे. याअंतर्गत पीएफ सदस्यांना प्रोफाइल अपडेट करण्यासाठी SOP आवृत्ती ३.० मंजूर करण्यात आली आहे. या नवीन नियमांचे पालन करुन UAN प्रोफाइल अपडेट करण्यासाठी कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. त्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म द्यावा लागेल.

EPFO Rule
ITR Filling: ३१ जुलैपूर्वी ITR फाइल करु शकला नाहीत? होऊ शकतो तुरुंगवास; जाणून घ्या सविस्तर

EPFO ने गाइडलाइन्समध्ये म्हटलंय की, PF खात्यामधील माहितीमध्ये अनेक चुका आहे.या चुका सुधारण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. डेटा अपडेट न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. त्यामुळे आता तुम्हाला प्रोफाइ अपडेट करावा लागणार आहे.

EPFOने प्रोफाइलमधील बदलांना लहान मोठ्या क्षेणींमध्ये विभागण्यात आले आहे. किरकोळ बदलांसाठी दोन आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागणार आहे तर मोठ्या सुधारणांसाठी तीन आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहे.प्रोफाइल अपडेट करताना पीएफ खातेधारकांना काळजी घेण्यास सांगितले आहे. जेणेकरुन कोणतीही फसवणूक होणार नाही.

EPFO Rule
E-Shram Card : असंघटित कामगारांसाठी सरकारची खास योजना, महिन्याला मिळणार 3000 रुपये; कसा घेता येईल लाभ? जाणून घ्या...

ईपीएफओद्वारे जारी केलेल्या गाइडलाइन्सनुसार, तुम्हाला प्रोफाइल अपडेट करण्यासाठी आधार कार्ड आणि त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.EPF सदस्यांना ई- सेवा पोर्टलद्वारे दुरुस्तीसाठी ही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नियोक्ताद्वारे EPF खात्याशी संबंधित डेटामध्ये सुधारणा केल्या जाऊ शकतात.

EPFO Rule
Lakhpati Didi Scheme: महिलांना व्यवसायासाठी मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com